Crime: रात्री झोपेत असतानाच मुलाने आईच्या अंगावर टाकला हात अन् त्यानंतर...; मस्तकात जाईल तळपायाची आग

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदाच्या अतर्रा येथे एका तरुणाने आपल्या सावत्र आईवर बलात्कार (Rape) करत मारहाण केली आहे. यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. महिलेने आपल्या मुलीला सगळा घटनाक्रम सांगितला. मुलीने आईला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली.   

Updated: Feb 6, 2023, 02:17 PM IST
Crime: रात्री झोपेत असतानाच मुलाने आईच्या अंगावर टाकला हात अन् त्यानंतर...; मस्तकात जाईल तळपायाची आग title=

Crime News: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदा येथे नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका मुलानेच आपल्या सावत्र आईवर बलात्कार (Rape) केला आहे. इतकंच नाही तर विरोध केला असता त्याने आईला बेदम मारहाण केली आणि नंतर घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने घटनेची माहिती मिळताच आईला रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. 

पीडित महिलेने सांगितल्यानुसार, तिच्या पतीने दोन लग्न केली होती. पहिली पत्नी जवळच राहते. आरोपी पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तोदेखील त्यांच्या घराच्या जवळच राहतो. रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत तो घरी आला आणि त्याने बलात्कार केला. आरोपीने घरात घुसखोरी करुन बलात्कार केला तेव्हा घरात कोणीही नव्हतं. बलात्कारानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. 

आरोपीचा शोध सुरु

अतर्रा पोलीस ठाण्याचे एसएचओ अनुप दुबे यांनी सांगितलं आहे की, गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सावत्र मुलाविरोधात बलात्कार आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या महिलेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. फरार आरोपीचा शोध सुरु आहे.