लखनऊ : उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. वधू-वरांनी सात फेरे घेऊन मांग भरण्याचा विधीही केला होता, मात्र कन्यादानाच्या वेळी वधूने अचानक लग्नाला नकार दिला. वधूने वराला पती म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि लग्नातील उर्वरित विधी पूर्ण न करण्यावर ठाम राहिली.
वधूवर फसवणुकीचा आरोप
वधूने लग्नाचे विधी करण्यास नकार दिल्याने दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. यानंतर पोलिसांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजू एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. वधूवर फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे.
कन्यादानाच्या वेळी वधूचा लग्नास नकार
प्रकरण अलीगढच्या चर्रा पोलीस स्टेशन हद्दीतील सिरौली गावातील आहे, जिथे लग्नादरम्यान सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. वधूच्या कुटुंबीयांनी मिरवणुकांचे स्वागत केले. सर्वांनी भोजन केले. यानंतर लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. वधू-वरांचे लग्न झाले आणि वराने वधूला सिंदूरही भरला, पण कन्यादानाच्या वेळी वधूने लग्नाला नकार दिला.
वधूने लग्नास का नकार दिला?
मंडपात कन्यादानाच्या वेळी वराने हात पुढे करताच वधू जोरात ओरडली. तिने लग्नास नकार दिला. कारण वराच्या एका हाताची तीन बोटे कापली गेलेली होती. वधूने आरोप केला आहे की वराच्या हाताची बोटे कापले असल्याची माहिती तिला दिली गेली नाही.