'माझ्या मांडीवर येऊन बस...' मेट्रोत सीटवरुन दोन मुली भिडल्या, एकीने कानाखाली लगावली तर दुसरीने ओढले केस

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिलांची एकमेकींशी एवढी जुंपली आहे की त्यांच्यात अक्षरशः विश्व युद्ध सुरु आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 6, 2025, 04:27 PM IST
'माझ्या मांडीवर येऊन बस...' मेट्रोत सीटवरुन दोन मुली भिडल्या, एकीने कानाखाली लगावली तर दुसरीने ओढले केस title=

दिल्ली असो वा मुंबई इथला प्रवास कायमच चर्चेत असतो. लोकांच्या सोईसाठी मेट्रोची सुविधा पुरवण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर ही मेट्रो कायमच वेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. प्रवास करताना प्रत्येकाला वाटतं की, आपल्याला थोडं बसायला मिळालं तर आराम मिळेल. आणि या सीटसाठी अनेकदा प्रयत्नही केले जातात. अशावेळी वाद हा ठरलेलाच आहे. असाच एक वाद दोन महिलांमध्ये झाला आहे. हा वाद बसण्याच्या जागेवरुन झाला. 

एकमेकींच्या झिंजा ओढल्या 

व्हायरल व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिल्ली मेट्रोचे दृश्य दिसते, परंतु देशाचे सरकार आणि दिल्ली मेट्रोमध्ये एक गोष्ट समान आहे. येथे खुर्ची आणि आसनावरून नेहमीच वाद होत असतात. कधी लाथ मारण्याची स्पर्धा तर कधी केस पकडून ओढण्याची स्पर्धा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडले आहे. किंबहुना सीटवरून होणारा संघर्ष इतका वाढला की, मेट्रोमध्ये उभी असलेली महिला सीट न मिळाल्याने आपल्या प्रतिस्पर्धी महिलेच्या मांडीवर बसली आणि यानंतर एकच वाद सुरु झाला.कानाखाली, एकमेकींना ढोसे मारणे आणि केसांनी ओढण्याची जणू स्पर्शाच सुरु झाली. 

जागांवरून युद्ध सुरू

व्हिडिओमध्ये ती महिला समोरच्या महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे, त्यानंतर ती सीटवरून उठते, महिलेच्या अक्षरशः कानाखाली लगावते. महिलेला तिच्या केसांनी पकडून मेट्रोच्या फरशीवर फेकते. या दोघांमधील लढाईचे अनेक लोक साक्षीदार आहेत. यातील एका महिलेचा आरोप आहे की, समोरच्या महिलेने तिच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला. एखाद्या माणसाने असेच केले असते तर लोकांनी त्याला पकडून मारहाण केली असती. म्हणूनच मांडीवर बसणे चुकीचे आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओलाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे, अशा परिस्थितीत सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले... भाऊ, तिने तिचे केस धरून मला ओढायला सुरुवात केली... लोकांमध्ये भांडणे होतात, गरीब लोक केस ओढतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले... महिलांना खरोखर कसे लढायचे हे माहित नसते, म्हणूनच त्या नेहमी केसांना लक्ष्य करतात.