Zomato: डिलीवरी बॉयचा संघर्ष पाहून नेटीझन्स भावूक, व्हीडिओ पाहून तुम्ही व्हाल इमोशनल

Trending Video : एका डिलीव्हरी बॉयचा व्हीडिओ (Zomato Delivery Boy) तुफान व्हायरल झालाय. या डिलिव्हरी बॉयने अनेकांची मनं जिंकलीत.

Updated: Aug 23, 2022, 04:37 PM IST
Zomato: डिलीवरी बॉयचा संघर्ष पाहून नेटीझन्स भावूक, व्हीडिओ पाहून तुम्ही व्हाल इमोशनल title=

Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल होतात. मात्र यापैकी काही व्हीडिओ असे असतात, जे आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातात. या  व्हीडिओच्या माध्यमातून आपल्याला परिस्थितीचा सामना कसा करायचा याची खरी शिकवण मिळते. कोणतंही कारण न देता प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करायची हे आपल्याला यातून समजतं. असाच एका डिलीव्हरी बॉयचा व्हीडिओ (Zomato Delivery Boy) तुफान व्हायरल झालाय. या डिलिव्हरी बॉयने अनेकांची मनं जिंकलीत. (trending video zomato delivery boy inspiring story work with 2 kids netizens appreciation his video viral on social media)

व्हीडिओमध्ये नक्की काय?

या व्हीडिओत झोमॅटो डिलिव्हरी बॉयने हातात काही बॅग्स पकडल्याचं दिसतंय. मात्र यामध्ये बॅगेत पार्सल नसून त्याच एक मुलगी आहे. तसेच सोबत आणखी एक मुलगा दिसून येतोय.  यामागचं कारण जाणून तुम्ही नक्कीच या डिलिव्हरी बॉयला सलाम कराल. मात्र त्याआधी हा व्हायरल व्हीडिओ नक्की पहा.

डिलिव्हरी बॉयची प्रेरणादायी कहाणी

"ही दोन्ही मुलं माझीच आहेत. हे दोघे ऑन ड्युटी माझ्यासोबतच असतात. मी यांना बाईकवर सोबतच घेऊन फिरतो",असं या डिलीव्हरी बॉयने म्हटलं. मुलांना कोणाच्या भरवश्यावर एकटं सोडायचं? तसेच घराची सोय नसल्याने हा डिलीव्हरी बॉय मुलांना सोबत ठेवत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हा व्हीडिओ पाहून अनेक जण भावूक झालेत. आपल्या अवतीभोवती असंख्य सोयीसुविधा असतात. मात्र त्यानंतरही आपण कारणं देत अनेक गोष्टी करणं टाळत असतो. मात्र यानंतरही या तरुणाने कोणतंही कारण न देता आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निवडलाय. या तरुणाला सलाम.