Credit Card Benifits : क्रेडीट कार्डचे माहित नसलेले 'हे' फायदे, जाणून घ्या

Credit Card योग्य प्रकारे वापरल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. या सणासुदीच्या मोसमात, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे छुपे फायदे जाणून घ्या आणि पैसे वाचवा. 

Updated: Aug 23, 2022, 04:13 PM IST
Credit Card Benifits : क्रेडीट कार्डचे माहित नसलेले 'हे' फायदे, जाणून घ्या title=
trending news know these benefits of credit cards that you dont know and which can be very useful

Credit Card Benefits: आज प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या कंपनीचं Credit Card असतं. अनेक ग्राहकांना Credit Cardचे Hidden Benefits माहिती नसतात. ग्राहक आपल्या हिशोबाने  Credit Card चा उपयोग करतात. तर काही लोक  Credit Card  वापरायला घाबरतात. कारण  Credit Card  नेमकं कुठे आणि कसं वापरायचं हे माहिती नसतं. त्यामुळे त्यांना  Credit Card पासून होणारे फायदे मिळतं नाही. 

 Credit Card योग्य प्रकारे वापरल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. या सणासुदीच्या मोसमात, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे छुपे फायदे जाणून घ्या आणि पैसे वाचवा. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात  Credit Card चे 9 फायदे.  (trending news know these benefits of credit cards that you dont know and which can be very useful)

1.वेलकम ऑफर -  ज्यामध्ये बहुतांश बँका/क्रेडिट संस्था कार्डधारकांना विविध प्रकारचे वेलकम ऑफर देतात. या भेटवस्तू व्हाउचर, डिस्काउंट किंवा बोनस रिवॉर्ड पॉइंट्सच्या स्वरूपात ग्राहकांना मिळतात.

2.फ्यूल सरचार्ज सूट - आजकाल ही सवलत जवळपास सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डांवर मिळते. जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनात इंधन भरता, तेव्हा तुम्ही विशिष्ट रक्कम खर्च केल्यास Credit Card वरुन पैसे भरल्यास तुम्हाला फ्यूल सरचार्ज सूट मिळते. 

3. रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक - Credit Card तुम्ही शॉपिंग केल्यास तुम्हाला काही रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक मिळतात. या  रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर मोफत भेटवस्तू मिळवण्यासाठी आणि इतर कोणत्याही वस्तूची किंमत कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तर कॅशबॅक हे थेट तुमच्या कार्ड खात्यात जातो. शिवाय रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी तुम्ही एअर माईल मिळवू शकता जे फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

4. एयरपोर्ट लाउंज एक्सेस - काही क्रेडिट कार्डे देशांतर्गत विमानतळांवर तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर वर्षातून एकदा किंवा अधिक वेळा विश्रामगृहात राहण्याची सुविधा देतात. ट्रॅव्हल-केंद्रित क्रेडिट कार्ड आणि प्रीमियम क्रेडिट कार्ड्सवर हे खास ऑफर दिले जातात. 

5.कॅश अॅडव्हान्स -आपत्कालीन परिस्थितीत रोख रकमेची गरज असल्यास तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरून थेट एटीएममधून पैसे काढू शकता. 

6. विमा- क्रेडिट कार्ड अपघाताच्या बाबतीत विमा आणि निश्चित कव्हर रक्कम देखील देतात. हे विमान अपघात कव्हरेज, कार्ड लॉस कव्हर किंवा परदेशी हॉस्पिटलायझेशन कव्हर देतात. 

7. EMI रूपांतर - क्रेडिट कार्डवर उपलब्ध EMI रूपांतरण हा सर्वात सामान्य फायदा आहे. तुम्ही तुमच्या मोठ्या खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करू शकता आणि काही महिन्यांच्या कालावधीत पेमेंट करू शकता.

8.अॅड-ऑन कार्ड - अनेक क्रेडिट कार्डे तुम्हाला अॅड-ऑन कार्ड ठेवण्याची परवानगी देतात जे तुम्ही तुमचा जोडीदार, भावंड, मुले आणि पालकांसह तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह शेअर करू शकता.अॅड-ऑन क्रेडिट कार्ड सामान्यतः प्राथमिक कार्ड सारखेच फायदे देतात.

9.Credit Card वर लोन - तुमच्या Credit Cardवर तुम्ही कुठलेही कागदपत्रे न देतात, ताबडतोब लोन घेऊ शकता. तुमच्या Credit Cardची लिमेटनुसार तुम्हाला लोन दिले जाते.