Reliance AGM 2022: 5G लॉन्चपासून जिओच्या IPO पर्यंत आज मोठ्या घोषणेपर्यंत; आज काय बोलणार Ambani?

या वर्षीची AGM खूप खास असणार आहे कारण रिलायन्स जिओ बहुप्रतिक्षित 5G लाँच करण्यासाठी कोणती तारीख आणि टाइमलाइन सेट करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Updated: Aug 29, 2022, 10:29 AM IST
Reliance AGM 2022: 5G लॉन्चपासून जिओच्या IPO पर्यंत आज मोठ्या घोषणेपर्यंत; आज काय बोलणार Ambani? title=
treading news today reliance agm 2022 updates jio ipos 5g plans and what will mukesh ambani announce

Reliance AGM 2022: बहुप्रतिक्षित 5G लॉन्चपासून जियोच्या IPO पर्यंत आज मोठी घोषणेची शक्यता आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीजची Reliance AGM 2022 आज दुपारी  2 वाजता सुरू होणार आहे. या AGMमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या 45व्या एजीएमला मुकेश अंबानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. (treading news today reliance agm 2022 updates jio ipos 5g plans and what will mukesh ambani announce)

या वर्षीची AGM खूप खास असणार आहे कारण रिलायन्स जिओ बहुप्रतिक्षित 5G लाँच करण्यासाठी कोणती तारीख आणि टाइमलाइन सेट करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच कंपनीच्या पुढील बिझनेस प्लॅनच्या घोषणेमध्ये कोणती मोठी घोषणा होईल, याची सर्व प्रतीक्षेत आहे. याशिवाय रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेलच्या आयपीओबाबत काय निर्णय घेणार आहेत हे पाहणे उत्सुकाचे आहे. 

त्यामुळे आरआयएलच्या गुंतवणूकदारांसोबतच कॉर्पोरेट जगत आणि शेअर बाजाराच्या नजराही या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमकडे लागल्या आहेत. 

AGM याठिकाणी पाहता येणार 

ही AGM अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसंच व्हर्च्युअल रिअॅलिटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.  कंपनीच्या डायरेक्ट मीटिंग लिंक व्यतिरिक्त, तुम्ही Twitter, Facebook, Ku, Jio Meet आणि YouTube द्वारे देखील पाहू शकाल. तुम्ही ट्विटरवर @flameoftruth ला भेट देऊन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमचे लाइव्ह व्हिडिओ आणि अपडेट पाहू शकता. कू वर जाऊन बघायचे असेल तर https://www.kooapp.com/profile/RelianceUpdates वर क्लिक करून ते पाहू शकता.