Akasa Air's Data Leakage: नुकत्याचं सुरू झालेल्या Akasa Air's Data Leakage झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये आकाश एअरलाइनच्या काही प्रवाशांची वैयक्तिक माहिती म्हणजे प्रवाशांचे नाव, लिंग, त्यांचा वैयक्तिक ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अशी वैयक्तिक माहिती लीक झाल्याची घटना समोर येत आहे.
या प्रकरणी आकाश एअरच्या एअरलाईनचे म्हणणे आहे की कंपनीने या घटनेची माहिती सरकारला दिली आहे. या डेटा लीकबद्दल कंपनीने आपल्या Website वर तिकीट बुक करणाऱ्या सर्व प्रवाशांना माहिती दिली आहे. तसेच हे प्रकरण सायबर सुरक्षेशी संबंधित आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) हे प्रकरण हाताळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत नोडल एजन्सीला या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
ट्विटर वापरकर्त्याने प्रश्न उपस्थित केला
आकाश एअरच्या ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करताना एका ट्विटर (Twitter) यूजरने आपले म्हणणे मांडले आहे. त्यात म्हटले आहे, “आमच्या लॉगिन आणि साइन-अप सेवेशी संबंधित तात्पुरती तांत्रिक कॉन्फिगरेशन त्रुटी 25 ऑगस्ट 2022 रोजी नोंदवली गेली.
काय झाले लीक झाले
काही Akasa Air नोंदणीकृत वापरकर्त्यांची माहिती त्यांचे नाव, लिंग, ई-मेल पत्ता आणि फोन नंबर अनधिकृत व्यक्तीने पाहिली आहे. कंपनी म्हणते की या तपशीलांव्यतिरिक्त प्रवासाशी संबंधित कोणतीही माहिती, प्रवास रेकॉर्ड किंवा पेमेंट माहितीशी तडजोड केली गेली नाही याची आम्ही पुष्टी करू शकतो.
अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करणे
कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, डेटा लीकशी संबंधित सिस्टम पूर्णपणे बंद करून "अन-अधिकृत प्रवेश" थांबविला आहे. या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाण्यासाठी, अतिरिक्त नियंत्रणे जोडल्यानंतर, लॉगिन आणि साइन-अप सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांविरोधात आपली यंत्रणा मजबूत करण्यासाठी काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.