अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम

प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य. 

Updated: Oct 26, 2022, 01:27 PM IST
अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम  title=
Traffic Challan Rules For riding bike In A Half Sleeves Shirt or T shirt know the rules

Challan rules : प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य. कारण, मानवी मेंदू काही संगणकाप्रमाणे चालत नाही. हो पण, हे नियम लक्षात नसले तरीही त्याबाबत तुम्हाला माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं. त्यामुळं चुकीच्या माहितीपेक्षा आज तुमच्यासमोर एक नियम उलगडला जाणार आहे.

अनेकांनाच असं वाटतं, की अर्ध्या बाह्यांचं शर्ट किंवा टी शर्ट (Short sleeves) घालून दुचाकी (bike) चालवल्यास त्यामुळे दंडात्मक कारवाईअंतर्गत चलान कापलं जातं. पण, प्रत्यक्षात मात्र तसं नाही. सध्या अस्तित्वात असणाऱ्या मोटर वाहन कायद्यामध्ये अशा संदर्भातील कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. 2019 मध्ये खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भातलं ट्विटही करण्यात आलं होतं.

अधिक वाचा : नोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी

कायदा अस्तित्वात नसला, तरीही वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कार चालवताना सीटबेल्टचा (seat belt) वापर, बाईक चालवताना हेल्मेटचा (helmet) वापर अनिवार्यच आहे. हे नियम फक्त कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या हितानंच आखण्यात आले आहेत ही बाब विसरता कामा नये.

तुमच्याकडून जर एखाद्या वाहतूक नियमाचं उल्लंघन झालं असेल आणि तुम्हाला याची कल्पनाही नसेल, तर तुम्ही online या सर्व गोष्टींबाबतची माहिती मिळवू शकता. यासाठी https://echallan.parivahan.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे आवश्यक तपशील दिल्यानंतर तुम्हाला वाहनावर चलान कापण्यात आलं आहे की नाही याची माहिती लगेचच मिळू शकेल.