Petrol-Diesel झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $92 च्या आसपास आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) दर...

Updated: Sep 10, 2022, 10:28 AM IST
Petrol-Diesel झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर  title=

Today Petrol- Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $92 च्या आसपास आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते.

यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. परिणामी पेट्रोल डिझेलच्याबाबतीत अजूनही ग्राहकांना दिलासादायक बातमी आहे. 

पेट्रोल आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार?

येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 ते 3 रुपयांनी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $90 च्या जवळ होता. तर जूनमध्ये प्रति बॅरल $125 वर पोहोचला होता. ब्रेंट क्रूड तेल (Crude Price Latest Update) सध्या प्रति बॅरल $ 92.84 वर आहे.

वाचा : Lalbaugcha Raja 2022 Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या..., जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर