रटाळ जॉबला वैतागला आहात ? मग 'ही' संधी बदलू शकते तुमचं आयुष्य

तुम्हांला तुमच्या रोजच्या कामाचा कंटाळा आलाय? तुमचं काम तुम्हांला आता बोअरिंग वाटतंय?

Dipali Nevarekar | Updated: Aug 19, 2018, 09:15 AM IST
रटाळ जॉबला वैतागला आहात ? मग 'ही' संधी बदलू शकते तुमचं आयुष्य  title=

मुंबई : तुम्हांला तुमच्या रोजच्या कामाचा कंटाळा आलाय? तुमचं काम तुम्हांला आता बोअरिंग वाटतंय? भटकणं आणि खवय्येगिरी तुम्हांला आनंद देऊ शकतं? मग तुमच्यासाठी एक मोठी संधी दारापाशी येऊन थांबली आहे. तुम्हांला रटाळ कामातून वर्षभरासाठी नक्की सुट्टी मिळू शकते आणि मोफत भटकंतीची सोयही होऊ शकते. हो ! हे शक्य आहे. तुम्ही जे वाचताय ते अगदी 100% खरं आहे. 

TLC देतेय संधी 

TLC या भारतातील लोकप्रिय लाईफस्टाईल चॅनलने ही संधी आणली आहे. TLC ने एका व्हिडिओच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. जर तुम्ही रटाळ जॉबच्या रहाटगाडग्यात अडकला आहात तर नक्की हा व्हिडिओ पहा. 

 

 

काय कराव लागेल ?

TLC कडे तुम्हांला 3 मिनिटांचा एक व्हिडिओ द्यावा लागेल. त्यामध्ये तुम्ही कामाला का कंटाळात आहात आणि TLC ची स्कॉलरशीप तुम्हांला कशी बदलू शकते याची माहिती द्यायची आहे. जर तुमचा व्हिडिओ असेल अगदी हटके तर तुम्हांला भारताच्या विविध प्रांतात मोफत फिरण्याची, विविध भागतील खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची संधी मिळणार आहे. 

The Calling  

विजेत्याला TLC चा आगामी कार्यक्रम The Calling साठी संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवी ओळख आणि व्हिडिओ ब्लॉग करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही संधी वर्षभराची असणार आहे. TLC च्या सुवर्णसंधीचं वास्तवात रूपांतर करण्यासाठी 27 ऑगस्टपूर्वी तुमचा व्हिडि अपलोड करा.