टीपू सुल्तान शालेय अभ्यासक्रमातून गायब होणार?

कर्नाटकचे शासक टीपू सुल्तान यांचा इतिहास कर्नाटक शालेय अभ्यासक्रमातून गायब होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 31, 2019, 12:06 AM IST
टीपू सुल्तान शालेय अभ्यासक्रमातून गायब होणार? title=

बंगळुरू : कर्नाटकचे शासक टीपू सुल्तान यांचा इतिहास कर्नाटक शालेय अभ्यासक्रमातून गायब होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारनं शालेय अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात टीपू सुल्तान यांचा धडा इतिहासाच्या पुस्तकातून हटवला जाऊ शकतो. 

शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी कर्नाटक टेक्स्ट सोसायटीच्या संचालकांना याबाबत अहवाल देण्यास सांगितलं आहे. 

भाजपा नेते अपाचू रंजन यांनी याबाबत मागणी केली होती. सरकारी खर्चातून टीपू सुल्तान जयंती साजरी करणं मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आधीच थांबवलं आहे. टिपू सुल्तान हा काही स्वातंत्र्यसैनिक नव्हता, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.