दबक्या पावलानं वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय

Viral Video : व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....

Updated: Oct 19, 2022, 12:44 PM IST
दबक्या पावलानं  वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय  title=
Tiger hunting peacock Video went viral

Viral Video : सोशल मीडियावर असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातही लहान मुलांचे व्हिडीओ (Kidas video), पाककलांचे (Food Video) व्हिडीओ आणि प्राणी- पक्ष्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. यातले काही Video धडकी भरवणारे असतात तर, काही मनोरंजक. जेव्हा (Animals Video) वन्यजीवांच्या व्हिडिओंचा विचार केला जातो, तेव्हा त्यापैकी बहुतेक दृश्य ही शिकारीच्या क्षणांची असतात. असाच एक व्हिडीओ तुमहीची नजर वळवेल इतका रंजक आहे. 

व्हिडिओमध्ये वाघ (Tiger) आणि मोर (Peacock) दिसतोय. आता तुम्ही म्हणाल वाघ आणि मोर, हे काहीही संबंध नसणारे प्राणी इथे एकत्र दिसतायत... कसं बरं? व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....

दोन मोर शेजारी शेजारी उभे असल्याचं तुम्हीही पाहू शकता. पुढे पण वाघ पंख पसरवणाऱ्या मोराच्या दिशेने झेपावतो. मात्र वाघाने धडक दिल्याने मोर उडून पळून जातात. इथे क्षणाचाही विलंब झाला असता तर मोर वाघाने पकडला असता आणि त्याचा फडशा पाडला असता. पण, तसं झालं नाही. कारण, वाघाची चाहूल लागताच मोरांनी उडून वाघाच्या तावडीतून पळ काढला. 

अधिक वाचा : Bathroom मध्ये तुम्हाला ही Creative Ideas सूचतात का? पाहा यावर शास्त्रज्ञ काय सांगतात

 

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ animals_powers या इंस्टाग्राम (instagram video) पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स (Likes and commetns) केल्या आहेत ज्यांना अनेक लाईक्सही आले आहेत. भारताचा राष्ट्रीय प्राणी आपल्या राष्ट्रीय पक्ष्याची शिकार करतो अशा कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत.