सावधान! Diwali दरम्यान, देशात फोफावणार कोरोना; पाहा नवी लक्षणं आणि महत्त्वाची माहिती

Coronavirus : अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. आता कुठे कोरोना संसर्गाच्या आघातातून आपण सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातच या प्रयत्नांना अपयश मिळताना दिसत आहे

Updated: Oct 19, 2022, 12:33 PM IST
सावधान! Diwali दरम्यान, देशात फोफावणार कोरोना; पाहा नवी लक्षणं आणि महत्त्वाची माहिती  title=
before diwali 2022 nation is on alert as Corona omicron subvarient bf 7 may spread rapidly know the symptoms and details

corona high risk india amid diwali : अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. आता कुठे कोरोना संसर्गाच्या आघातातून आपण सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातच या प्रयत्नांना अपयश मिळताना दिसत आहे. कारण, कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट देशात सक्रीय होताना दिसत आहे. याबाबत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. 

दिवाळी (Diwali 2022 ) अगदी तोंडावर आली आहे. कोरोनामुळे (Coronavirus) दोन वर्षे कोणताही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने लोकांनी सगळे सण उत्सव साजरा केले होते. पण, यावर्षी मात्र निर्बंधमुक्त दिवाळी साजरा करु, अशा आशेवर सर्वजण असताना त्यावर संकटांचं विरजण पडलं आहे. 

हे संकट आहे (Omicron) ओमायक्रॉन व्हेरीएंटचा नवीन उप्रकार बीए. 5.1.7 चं.  तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, इतर व्हायरसच्या तुलनेत हा नवा व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरत आहे. जर आपण वेळीच काळजी घेतली नाही तर कोविड (covid) च्या रुग्णांमध्ये वाढ होम्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

गुजरात (Gujrat) बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरला भारतातील बीएफ. 7 या सब-व्हेरिएंटचे पहिले रुग्ण आढळले होते. चीनमध्ये (China Corona) कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास हाच सब व्हेरिएंट कारणीभूत ठरत आहे अशीही माहिती समोर आलीये. 

अधिक वाचा : शास्त्रज्ञांचा आगीशी खेळ; तयार केला 80% घातक कोरोना स्ट्रेन 

 

फक्त चीनमध्ये नाही तर यूएस (UAS), ऑस्ट्रेलिया (Australia), यूके (UK) आणि बेल्जियम (Belgium) मध्येही या नव्या व्हायरसची वाढलेली प्रकरणं समोर आली आहेत. हा नवा व्हायरस संपूर्ण लसीकरण झालेल्या आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांनासुद्धा आपल्या विळख्यात खेचत आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा मास्क लावण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.  

कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटची लक्षणं खालीलप्रमाणे... (Symptoms of new corona sub variant)
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप लसीकरण (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, नव्या विषाणूची लक्षणं आधी आलेल्या कोविड-19 च्या लक्षणांप्रमाणेच असतील. पण, त्यात आता (Body pain) अंगदुखीची नव्यानं भर पडत आहे. जर एखादा व्यक्ती बऱ्याच काळापासून अंगदुखीने त्रस्त असेल तर त्याला कोविड चाचणी (Covid test) करुन घेणं आवश्यक आहे. तसंच घशामध्ये खवखव, थकवा, आणि वाहते नाक (Runny nose) ही सगळी नव्या कोरोना व्हायरसची लक्षणं सु शकतात. 

अधिक वाचा : Blood Donation: रक्तदान करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का?जाणून घ्या

 

(Prcautions while celebrating diwali) दिवाळीपुर्वी घ्या 'ही' खबरदारी.... 
तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनाच्या या नव्या सब व्हेरिएंटला घाबरण्याचीपेक्षा त्यापासून दूर राहण्याला जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.  गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क अवश्य वापरणं, आवश्यकता असल्यासच गर्दीच्या ठिकाणी जावं, बाहेरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणं, जेवढे शक्य होईल तेवढं सामाजिक अंतर पाळणं या सर्वसामान्य सवयी पाळून तुम्ही कोरोनाला दूर ठेवू शकता.