अनुष्का विराटवर चिडते तेव्हा....

विराट आणि अनुष्काच्या या हावभावांविषयी आता नेटकरी निरनिराळे अंदाज लावून मजेशीर कॅप्शन्ससह हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

Updated: Jul 8, 2018, 08:35 PM IST
अनुष्का विराटवर चिडते तेव्हा.... title=

नवी दिल्ली: इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने नुकतेच महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी, मुलगी झिवा यादेखील उपस्थित होत्या. याशिवाय, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनला उपस्थित होती. यावेळी टिपण्यात आलेले एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये सर्व खेळाडू सेलिब्रेशनमध्ये मग्न असताना अनुष्का शर्मा विराट कोहलीकडे काहीशी रागाने बघताना दिसत आहे. ही बाब नेटकऱ्यांनी लगेचच हेरली आणि त्यावरून आता मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. विराट आणि अनुष्काच्या या हावभावांविषयी आता नेटकरी निरनिराळे अंदाज लावून मजेशीर कॅप्शन्ससह हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या छायाचित्रांची मिम्स तयार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. विरानुष्का पंतप्रधान मोदींना लग्नाला आमंत्रण द्यायला गेल्यापासून त्यांच्या लग्नापर्यंतच्या अनेक फोटोंची मिम्स करण्यात आली होती.