Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेलेल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari ) यांच्याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणणारे निर्बंध सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) लादले आहेत. राज्यपालांना तूर्त आमदारांची नियुक्ती करता येणार नाही. राज्यपालांच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध लादले आहेत. राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी राज्यपालांनी मंजूर केली नाही. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे.