आईने पोटच्या मुलाला घरातून हाकलून दिलं, आज तोच बनला देशातला पहिला ट्रान्सजेंडर पायलट

देशातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर पायलटच्या संघर्षाची कहाणी, कुटुंबियांनी घराबाहेर काढलं, तृतीयपंथी समाजाने जवळ केलं 

Updated: Dec 2, 2022, 06:45 PM IST
आईने पोटच्या मुलाला घरातून हाकलून दिलं, आज तोच बनला देशातला पहिला ट्रान्सजेंडर पायलट title=

India's First Transgendor Pilot : प्रत्येक आईला आपलं मुल प्रिय असतो.  मुलाचं पालनपोषण करण्यासाठी आई जीवाचं रान करते. पण त्याच पोटच्या मुलाला आईनेच घरातून बाहेर काढलं तर. आपला मुलगा तृतीयपंथी असल्याचं समजल्यावर आईने त्याला मारहाण केली. घरात कोंडूनही ठेवलं. इतकंच काय तर त्याला शारीरिक आणि मानसिक त्रासही देण्यात आला. शेवटी त्याला घरातून बाहेर काढलं. पण आज त्याच मुलाने अशी कामगिरी केली आहे कि संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटतोय.

देशातला पहिला ट्रान्सजेंडर पायलट
तृतीयपंथी आहे म्हणून ज्या मुलाला घराबाहेर काढलं त्या मुलाचं नाव आहे अॅडम हॅरी (Adam Harry). अॅडम हॅरी हा देशातला पहिला ट्रान्सजेंडर (Transgender) पायलट (pilot) बनला आहे. हॅरीला जेव्हा घरातून बाहेर काढलं तेव्हा त्याची परिस्थिती खूपच वाईट होती, अंगावर असलेल्या कपड्यांसह बाहेर पडलेल्या हॅरीच्या खिशात एकही रुपया नव्हता. फुटपाथवर झोपून त्याने कसेबसे दिवस काढले. पण इतक्या संघर्षानंतरही हॅरीने हार मानली नाही.

हॅरी असा बनला पायलट
लहानपणापासूनच हॅरीचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं. निराधार असतानाही हॅरीने कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने प्रायव्हेट पायलट लायसन्ससाठी परीक्षा दिली. 2017 मध्ये हॅरीच्या प्रयत्नांना यश आलं. जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) त्याला पायलचा परवाना मिळाला. पैशांसाठी हॅरी ज्यूसचं एक छोटसं दूकान चालवत होता. पण पुढच्या शिक्षणासाठी खर्च त्याच्या आवाक्यात नव्हता.

केरळ सरकारकडे मागितली मदत
हॅरीने यासाठी केरळ सरकारकडे (Kerala Government) मदत मागण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव बीजू प्रभाकर यांना त्यांनी आपला संपूर्ण संघर्ष सांगितला. बीजू प्रभाकर यांनीही हॅरीचा संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर हॅरीने तिरूवंतपुरमच्या राजीव गांधी एविएशन टेक्नॉलॉजी अकॅडमीतून शिक्षण पूर्ण केलं. यासाठी केरळ सरकारने त्याला 22.34 लाख रुपयांची स्कॉलरशीप दिली. सरकारच्या आर्थिक मदतीने हॅरीचं आकाशात उडाण घेण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे.