Chhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई

Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची. 

Updated: Nov 30, 2023, 07:26 PM IST
Chhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई title=
State Elections 2023 Exit Polls Chhattisgarh Vidhan Sabha Constituency Seat Wise Exit Poll Results Prediction News in Marathi

Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची. आज पाचही राज्यांच्या निवडणुक निकालाचे एक्झिट पोल आलेले आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, भाजपला 36-46 जागा तर, अपक्षांना 01-05 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पाचही राज्यांच्या निवडणुक निकालांचे एक्झिट पोल आज जाहिर झाले आहेत. छत्तीसगड राज्यांचा विचार केल्यास सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अॅक्सेस माय इंडिया सर्व्हेच्यानुसार, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला 40 ते 50 जागा तर, भाजपला 36 ते 46 जागा आणि अपक्षांना 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात असून राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेत येऊ शकते. 

छत्तीसगड सद्यस्थिती

एकूण - ९०
काँग्रेस ७१
भाजप - १४
बसप - २
जेसीसी - २
अन्य - १

 

एबीपी-सी व्होटरच्या मते

एनडीटीव्ही व्होटरचा अंदाज

सीएनएक्स व्होटरचा अंदाज,

छत्तीसगड राज्याचा एक्झिट पोल