श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण वाढलं आहे.
काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवायांना काही प्रमाणात बेरोजगारी आणि सोशल मीडियाचा अवाजवी वापर कारणीभूत असल्याचं लष्कराच्या उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल देवराज अंबूयांनी म्हटलं आहे.
लष्करात धार्मिक भेदभावात अजिबात थारा नसल्याचंही अबू यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात वाढलेल्या लष्करी कारवाया आणि त्या अनुषंगानं वाढलेली शहिदांची संख्या याविषयीही अंबू सवित्तर उत्तर दिलं आहे.
तरुणांचे दहशतवादी संघटनेत भरती होण्याचे प्रमाण वाढणं ही चिंतेची बाब आहे. आता या समस्येवर मात करण्याची गरज आहे. २०१७ मध्ये आम्ही दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनाच लक्ष केले आणि यात आम्हाला यश आलं.