Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी वशिष्ठ गुहेचा काय संबंध? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत असताना आता आणखी एक मोठी अपडेट मिळत आहे. 

Updated: Nov 19, 2022, 09:26 AM IST
Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी वशिष्ठ गुहेचा काय संबंध? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा  title=
shraddha murder case aftab poonawalla vashistha cave in uttarakhand

Shraddha Murder Case: दिल्लीतील हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात खळबळ माजलेली असताना श्रद्धा वालकर (Shraddha Walkar murder case) हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होते आहेत. श्रद्धाचा नवा फोटो समोर आल्यानंतर आता नवा खुलासा होत आहे. श्रद्धाच्या हत्येपूर्वीचे हे फोटोज आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawala) अत्याचाराची कहाणी सांगत आहेत. श्रद्धाच्या नव्या (Shraddha Walkar new photo) फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. यावरुन समजते की, अफताब हा नेहमीच श्रद्धाला मारहाण करायचा. त्यातचा आता उत्तराखंडमधील वशिष्ठ गुहेसोबत श्रद्धा वालकरचे काय संबंध होतं याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

या ठिकाणी श्रद्धाने शेवटचा रील 

28 वर्षीय आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या (Shraddha Walkar murder case) करून तिचे 35 तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. ओळख लपवण्यासाठी श्रद्धाचा चेहरा जाळल्याची कबुली आफताबने (Aftab Poonawalla पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. पोलिसांना आतापर्यंत 13 तुकडे सापडले आहेत. त्यांची फॉरेन्सिक आणि डीएनए तपासणी (Forensic and DNA testing) केली जाईल. याचदरम्यान एक माहिती समोर येते ती म्हणजे हत्येच्या काही दिवस आधी 4 मे रोजी श्रद्धा आफताबसोबत उत्तराखंडमधील शिवपुरीजवळील वशिष्ठ गुहेत (Vasishtha Caves near Shivpuri) गेली होती. या गुहा गंगा नदीच्या काठावर आहेत. येथूनच श्रद्धाने शेवटचा रील बनवला आणि सोशल मीडियावर (Shraddha last reel on social media) पोस्ट केला होता. 

वाचा: आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं? दिल्ली पोलिसांची टीम मुंबईत 

हत्येच्या 15 दिवसांपूर्वी शेवटचा रील

उत्तराखंडमधील वशिष्ठ गुहा (Vasishtha Caves ) त्याच्या पौराणिक महत्त्व आणि आध्यात्मिक आदरासाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या ती इतर कारणांमुळे चर्चेत आहे. हे ठिकाण ऋषिकेशपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. तिथूनच श्रद्धाने तिच्या हत्येच्या 15 दिवसांपूर्वी शेवटचा रील बनवला होता. वशिष्ठ गुहेची देखभाल श्री पुरुषोत्तमानंद आश्रमाकडून केली जाते. त्याचे व्यवस्थापक प्रसिद्ध मिश्रा यांनी सांगितले की लोक येथे शांतता आणि विश्रांती शोधण्यासाठी येत असतात. पोलिसांनी श्रद्धाचा फोटो दाखवल्यावर मिश्रा म्हणाले की, देशभरातून अनेक लोक तिथे येतात, अशा परिस्थितीत मुलीलाचा चेहरा ओळखणे कठीण असते. मात्र या आश्रमात रात्रीच्या मुक्कामाची कोणतीही व्यवस्था नाही, अशी माहिती मिश्रा यांनी दिली आहे. 
 
श्रद्धा हत्याकांडात आतापर्यंत समोर आलेल्या ठळक अपडेट

- घरमालकाने आफताबचे पोलिस व्हेरिफिकेशन केले नाही.
- संशय येऊ नये म्हणून कामावर जात राहिला, श्रद्धाचे सोशल मीडिया अॅक्टिव्ह ठेवले.
- रोज रात्री 2 वाजता लोकेशन जंगलाचे आढळले, यामुळेच पकडले
- 10 दिवसांपूर्वी मारले असते, पण श्रद्धा इमोशनल झाली होती
- क्राइम शो वेब सिरीज पाहिल्यानंतर गुन्हा लपवण्याची कल्पना आली
- 18 मेपूर्वीच मारण्याचा निर्णय घेतला होता. 

वाचा: आफताबच्या क्रौर्याचं सोशल मीडियात कौतुक, कोण करतंय श्रद्धाच्या मारेकऱ्याचं समर्थन?

आफताबने 10 तास केले श्रद्धाचे तुकडे

आफताबने कबुल केले आहे की त्याला श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी सुमारे 10 तास लागले होते. त्याने एक तासापर्यंत सर्व तुकडे पाण्याने धुतले. यानंतर सर्व तुकडे पॉलिथीनमध्ये टाकून ते त्याने फ्रिजमध्ये ठेवले. यादरम्यान त्याने ऑनलाईन जेवणही मागवले. काम संपवल्यानंतर त्याने बिअर आणली, नंतर नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपला. मात्र त्याने कोर्टात जबाब बदलला तर ही कहाणी सिद्ध करणे मोठे आव्हान ठरेल

"मोदी सरकारमुळेच श्रद्धासारखे प्रकरण घडतात"

याचदरम्यान आसाममध्ये श्रद्धा हत्याकांडप्रकरणी AIUDF आमदार अमिनुल इस्लाम (AIUDF MLA Controversial Statement) यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. आमदार अमिनुल इस्लाम म्हणाले की, श्रद्धासारखे प्रकरण मोदी सरकारमुळे घडले. मोदी सरकार येण्यापूर्वी अशा घटना घडल्या नाहीत की एखाद्याचे तुकडे झाले. भाजप विकासाच्या नावावर मते मागत नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi) दीर्घकाळ राहिले तर प्रत्येक शहरात असे प्रकार घडत राहतील. असे वादग्रस्त विधान आसामचे आमदार अमिनुल इस्लाम यांनी केले आहे.