दात दुखतो म्हणून दवाखान्यात आला, बसल्या बसल्या पडला तो उठलाच नाही... धक्कादायक Video व्हायरल

दाताच्या दवाखान्यात पेपर वाचत बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, Video पाहून अंगाचा उडेल थरकाप

Updated: Nov 13, 2022, 07:01 PM IST
दात दुखतो म्हणून दवाखान्यात आला, बसल्या बसल्या पडला तो उठलाच नाही... धक्कादायक Video व्हायरल title=

Shocking Video : दात दुखतो म्हणून एक तरुण दातांच्या दवाखान्यात गेला होता. दवाखान्यात बेंचवर पेपर वाचत असताना तो तरुण कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. हा व्हिडिओ (Video) पाहून अंगाचा अक्षरश: थरकाप उडतो. त्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ काय आहे?
राजस्थानमधल्या बाडमेर जिल्ह्यातील पचपदरा या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत आपण पाहू शकतो एक तरुण बेंचवर पेपर वाचत बसलेला असतो. पण बसल्या बसल्याच तो बेंचवरुन खाली कोसळतो. यात त्याचा जागीच मृत्यू होतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला हृदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला. सध्याचं दैनंदिन कामकाज आणि बदलेली जीवनशैली यामुळे हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. 

कोरोनानंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ
तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर देशभरात हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. वयोवृद्धच नाही तर तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण लक्षणीय आहे. तरुण वर्गातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन होण्याच्या घटना वाढत आहेत. फुफ्फुस आणि हृदय हे शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव आहेत जे कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित होतात.

पाहा आकडेवारी काय सांगते
एका अहवालानुसार 2020 मध्ये म्हणजे कोरोनाच्या आधीच्या वर्षात हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 500 असेल तर 2021 मध्ये म्हणजे कोरोना काळात तेच प्रमाण जवळपास 3000 इतकं झालं आहे. मुंबईत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 23.8 टक्के मृत्यू हे केवळा हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकावे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांचा अहवाल काय सांगतो?
दिल्लीतल्या गंगाराम रुग्णालयाने यावर अभ्यासही केला आहे. यात हृदयविकारामुळे मृत्यू झालेल्या 250 जणांच्या मृत्यूचं कारण शोधण्यात आलं. यात 51 टक्के लोकं हायपर टेंशनमुळे पीडित होते, 18 टक्के लोकं मधुमेहाचे रुग्ण होते, तर 4 टक्के लोकांना धुम्रपानाची सवय होती. 28 टक्के रुग्ण हे डिस्लिपिडेमिक होते. तसंच, 26 टक्के रुग्ण असे होते ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे.