लग्नातील सप्तपदी आधीच वधू झाली आई, नवरदेवची प्रतिक्रिया ऐकून तुम्ही म्हणाल...

लग्न हे प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील सगळ्या मोठ्या गोष्टींपैकी एक आहे. यादिवसानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचं आयुष पूर्णपणे बदलतं.

Updated: Feb 4, 2022, 08:34 PM IST
लग्नातील सप्तपदी आधीच वधू झाली आई, नवरदेवची प्रतिक्रिया ऐकून तुम्ही म्हणाल... title=

मुंबई : लग्न हे प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील सगळ्या मोठ्या गोष्टींपैकी एक आहे. यादिवसानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचं आयुष पूर्णपणे बदलतं. यामध्ये खरी परीक्षा असते ती, मुलीची. कारण तिला अनोळखी लोकांमध्ये जाऊन तेथील लोकांना, तेथील चालिरितींना समजुन घ्यायचं असतं. लग्नाच्या दिवसाची प्रत्येक मुलगी आतुरतेनं वाट पाहत असते आणि तो दिवस खुप स्पेशल असावा असं त्यांना वाटतं. लग्नानंतर नववधू संसार थाटतात आणि मग नंतर आपलं कुटुंब नियोजनाचा विचार करतात. परंतु एक अशी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये नववधूने लग्नाच्या आदल्या दिवशीच एका मुलाला जन्म दिला.

या मुलीचं आता काय होणार? नक्की काय घडलं असेल? तिच्या आई वडीलांवरती काय परिस्थिती आली असेल? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थीत होऊ लागले असतील. परंतु ही घटना थोडी वेगळी आहे.

इथे हळदीचा कार्यक्रम सुरू असताना वधूला प्रसूती वेदना होत असल्याने लग्नाचा कार्यक्रम मध्येच थांबवला गेला. कुटुंबीयांनी वधूला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला. हे प्रकरण जिल्ह्यातील बडेराजपूर ब्लॉकमधील बांसकोट गावातील आहे.

किंडगिडीही जिल्हा नवरंगपूर ओरिसा येथील रहिवासी असलेल्या वधूची आई सरिता मांडवी यांनी सांगितले की, आदिवासींमध्ये सुरू असलेल्या 'पैठू' प्रथेमुळे हे सगळं घडलं आहे.

त्यांची मुलगी शिवबती मांडवी ही ऑगस्टमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तिच्या आवडीचा मुलगा चंदन नेताम, रहिवासी बांसकोट याच्या घरी पैठूसाठी गेली होती. जिथे ती जवळपास 6 महिने राहिली, ज्यामुळे ती गरोदर राहिली.

पैठू पद्धत म्हणजे नक्की काय?

आदिवासी समाजात एक वेगळी प्रथा आहे ज्यात ना मुहूर्त पाहिला जातो ना कुंडली जुळवली जाते, पण मुले-मुली एकमेकांना समजून घेतात आणि आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत मनमोकळे पणाने राहातात. जर त्यांना मुलगा किंवा मुलगी पसंत पडली, ते विवाहयोग्य वाटले, तर मग नंतर या दोघांचं लग्न करुन देतात. ही प्रथा आजही ग्रामीण भागात सुरू आहे.

दोघांनी एकमेकांसोबत राहण्याची संमती दर्शवल्यानंतर, दोघांच्या घरच्यांनी ठरवलं की आता त्यांचे लग्न करायचं. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापल्या नातेवाईकांना लग्नाची माहिती दिली. पण लग्नाच्या तयारीमुळे थोडा विलंब झाला आणि लग्नाचा शुभ मुहूर्तही निघून गेला. ज्यामुळे या नववधूने लग्नातच मुलाला जन्म दिला.

30 जानेवारी 2022 रोजी नवरा- नवरीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. 31 जानेवारी रोजी आशीर्वाद समारंभ आणि भोजनाचा कार्यक्रम होता. मात्र हळदी समारंभात वधूच्या पोटात दुखू लागले. ज्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे सकाळी तिने एका मुलाला जन्म दिला. ही बातमी ऐकल्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फार आनंद झाला. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.