मुंबई : पश्चिम बंगालच्या पूर्वा बर्धमान जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला बोलावून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 22 वर्षीय तरुणी या तरुणासोबत 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. हा शॉट पूर्णपणे फिल्मी स्टाईलमध्ये करण्यात आला आहे. नात्यात येणाऱ्या अंतरामुळे मुलगी त्रस्त असल्याचं समोर आलं आहे.
एका वेबसाईटच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री कटवा पोलीस ठाण्याच्या केशिया गावात घडली. याप्रकरणी गुरुवारी पोलिसांना सांगितलं की, मैत्रिणीने त्याला स्थानिक सर्कस मैदानावर भेटण्यासाठी बोलावलं. ती नुकतीच झारखंडहून परत आली होती जिथे ती काम करायची.
प्रेयसी सर्कस मैदानावर येताच गर्लफ्रेंडने तरूणाला आधी किस केलं. ही तरूणी सिगारेट काढून प्यायली, त्यानंतर अचानक पिस्तूल काढून बॉयफ्रेंडवर गोळी झाडली.
गोळी पोटाला स्पर्श करून निघून गेली. मात्र त्यानंतर मुलगी तिथून पळून गेली. या घटनेनंतर तरूणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विलंब न करता तातडीने कारवाई करत तरुणीला अटक केली.
या घटनेमागे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे मुलगी नाराज होती. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.