मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणुकीबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की बँक तपशील, ATM किंवा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका. भेटवस्तूच्या अमिशाला बळी पडून बनावट लिंकवर क्लिक केल्याने अनेक वेळा लोक फसवणुकीचे बळी ठरतात. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देते.
बँकेने म्हटले आहे की, बँक किंवा त्यांचे कर्मचारी तुम्हाला खाते क्रमांक, डेबिट कार्ड तपशील आणि इंटरनेट बँकिंग संबंधित माहिती यासारखी संवेदनशील माहिती कधीही विचारणार नाहीत. त्याच वेळी, बँक OTP मागत नाही किंवा फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे तृतीय पक्षाच्या लिंकवर क्लिक करण्यास सांगत नाही.
त्यामुळे एसबीआयच्या नावाने कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून अशी माहिती मागवण्यात आलेले मेसेज आले तर सावध व्हा. वास्तविक काही सायबर भामटे ग्राहकांना एसबीआयच्या नावाने मेसेज करून तपशील विचारीत असतात.
ग्राहकांनी त्यांचा खाते क्रमांक, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड तपशील शेअर करू नये. मोबाईल फोन किंवा मॅसेजवरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये. त्याचबरोबर ग्राहकाने बनावट ई-मेल आयडीला उत्तर देऊ नये.
Sharing is not always caring.
SBI says never share your bank details & ATM or UPI PINs with anyone. #SafetyFirstWithSBI#SafetyFirstWithSBI #SBI #StateBankOfIndia #StaySafe #StaySecure #BeAlert #CyberSafety #CyberSecurity pic.twitter.com/xAohwXp36P— State Bank of India (@TheOfficialSBI) November 19, 2021
जर तुम्हाला असे संदेश येत असतील तर ते काळजीपूर्वक वाचा. याशिवाय ग्राहक सायबर क्राईमच्या https://cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रारी नोंदवू शकतात.
तसेच हेल्पलाइन क्रमांक 155260 वर देखील याबद्दल माहिती देऊ शकतात.
किंवा SBI च्या ग्राहकाच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होत असल्यास, ते ग्राहक सेवा क्रमांक 1800111109 वर कॉल करू शकतात.