'राष्ट्रपती मुर्मू विधवा असल्याने...'; सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका

Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसदेसंदर्भात बोलताना सनातन धर्माचा संदर्भ जोडत टीका केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 21, 2023, 08:58 AM IST
'राष्ट्रपती मुर्मू विधवा असल्याने...'; सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका title=
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केलं विधान

Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण सनातन धर्म असं म्हणायचं का? असा सवालही स्टॅलिन यांनी विचारला आहे.

800 कोटी रुपये खर्च करुन...

उदयनिधी स्टॅलिन यांनी मदुरैमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. आम्ही याच्याविरोधात आवाज उठवत राहू असं स्टॅलिन म्हणाले. 800 कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आलेलं नवीन संसद भवन ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. असं असतानाही भारताच्या पहिल्या नागरिक असलेल्या राष्ट्रपती मूर्मू यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. त्या आदिवासी समाजातून येतात आणि त्या एक विधवा असल्याने त्यांना या कार्यक्रमापासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आलं, असा आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी केला.

आदिनम संतांना बोलवलं पण...

"नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांनी (भाजपाने) उद्घाटनासाठी तामिळनाडूमधील आदिनम संतांना बोलवलं पण भारताच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं नाही. राष्ट्रपतींना आमंत्रित न करण्यामागील कारण म्हणजे त्या एक विधवा असून आदिवासी समाजातील आहेत. हाच सनातन धर्म आहे का? मूर्मू यांना संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आधीही आमंत्रित करण्यात आलं नाही आणि सध्या सुरु असलेल्या विशेष अधिवेशनामध्येही त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही," असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.

अभिनेत्रींनाही बोलवलं पण राष्ट्रपतींना नाही

उदयनिधी स्टॅलिन यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये सादर करण्यात आलं तेव्हा सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आलं. मात्र राष्ट्रपतींना त्यांची खासगी कारण देत यापासून दूर ठेवण्यात आलं, असंही म्हटलं. अशा घटना म्हणजे सरकारच्या निर्णयांवर 'सनातन धर्माचा' प्रभाव असल्याचे संकेत आहेत, असंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.

नक्की वाचा >> 454 विरुद्ध 2 मतांनी महिला आरक्षण विधेयक संमत! विरोधात मतं देणारे 2 खासदार कोण? विरोधाचं कारणही आलं समोर

मी घाबरत नाही

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरुन यापूर्वी केलेल्या टीकेनंतर वाद झाला होता. या वादावरही उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. लोकांनी माझं मुंडकं छाटणाऱ्यांना बक्षिस देण्याचं जाहीर केलं. मात्र मी अशा गोष्टींनी कधीच व्यथित होत नाही. डीएमकेची स्थापनाच सनातन संपवण्याच्या सिद्धांतावर झाली आहे. आम्ही तोपर्यंत शांत बसणार नाही जोपर्यंत आमचं हे लक्ष्य पूर्ण होत नाही, असंही उदयनिधी स्टॅलिन यांनी या भाषणात म्हटलं.