अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या साबरमतीमध्ये रानिप मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क बजावला. रांगेत उभं राहून मतदान केले.
दरम्यान, मतदानानंतर मोदींचा रोड-शो दिसून आला. यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगची तक्रार दाखल केली. आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरात विधानसभेच्या साबरमती मतदारसंघातल्या ११५ मतदान केंद्रावर आपलं मतदान केलं. दुपारी पावणे १२वाजण्याच्या सुमारास मोदींचं मुंबईहून अहमदाबादच्या विमानतळवर आगमन झालं. त्यानंतर आपल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या ताफ्यातून मोदी मतदान केंद्रावर पोहचले.
#WATCH Ahmedabad: PM Narendra Modi leaves after casting his vote at booth number 115 in Sabarmati's Ranip locality. #GujaratElection2017 pic.twitter.com/cRqbmApgMv
— ANI (@ANI) December 14, 2017
मोदी येणार आहे माहित असल्यानं रस्त्याच्या दुतर्फा जनतेनं मोठी गर्दी केली होती. मोदींचा ताफा थेट मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगेत उभे राहिले. मतदानानंतर मोदींनी रस्त्याच्या दुतर्फा मतदाना केल्याचं निषाण दाखवून उपस्थितांना अभिवादन केलं. यावेळी पत्रकाराशी बोलणं मात्र मोदींनी टाळलं.