ज्योतिरादित्यांच्या राजीनाम्यावर राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया

मध्यप्रदेशच्या राजकारणात उलथापालथ 

Updated: Mar 11, 2020, 12:00 PM IST
ज्योतिरादित्यांच्या राजीनाम्यावर राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया  title=

भोपाळ : मध्यप्रदेशवरील सध्य परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारपासून सुरू असेलल्या या नाट्यमय घडामोडी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच राहुल गांधी बोलले आहेत. 

राहुल गांधी यांना मध्यप्रदेशच्या घडामोडींवर प्रश्न विचारला असता त्यांनी फक्त 'धन्यवाद' अशी प्रतिक्रिया दिली आहे. कलमनाथ सरकारच्या 6 मंत्र्यांसह 22 आमदारांसोबत ज्योतिरादित्य सिंधियांनी राजीनामा देत काँग्रेसला रामराम म्हटलं. यानंतर कमलनाथ सरकार अल्पमतांमध्ये आली आहे. 

मंगळवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत अपक्षांसह एकूण 94 आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदारांना वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना मध्यप्रदेशमधून दूर ठेवलं आहे. 

सिंधिंयांचे समर्थक आमदार बनणार मध्यप्रदेशचे मंत्री 

मध्यप्रदेशात बहुमताकरता जवळपास 104 आमदारांची गरज आहे. कारण 22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेतील सदस्यांची संख्या 230 वरून कमी होऊन 206 इतकी झाली आहे. दोन आमदारांच निधन झाल्यामुळे त्या जागा देखील मोकळ्या आहेत. सुत्रांकडून अशी माहिती मिळते की, राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी 5 ते 7 आमदार मध्यप्रदेशच्या भाजप सरकारसोबत मंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. 

भाजपने आपल्या आमदारांना भोपाळमधून बाहेर पाठवलं आहे. भाजपने आपल्या 106 आमदारांना भोपाळमधून हरियाणाच्या मानेसरमध्ये पाठवलं आहे. सिंधिया समर्थकांपैकी 19 आमदारांना बंगलुरूहून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. तर काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपुरला पाठवलं आहे. 

महत्वाचं म्हणजे 26 मार्च रोजी मध्यप्रदेशमध्ये तीन राज्यसभेच्या जागांकरता निवडणुका होणार आहे.