UPSC Interview Questions: यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग..यूपीएससी देशात घेतली जाणारी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात. मात्र सर्वांनाच या परीक्षेत यश मिळतं असं नाही. काही जणांना यश मिळतं, तर काही जणांच्या पदरी अपयश पडतं. आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस इत्यादी पदांची भरती केली जाते. या परीक्षेसाठी देशातील कुठल्याही भागातून विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. आयएएस किंवा आयपीएस होण्यासाठी लेखी परीक्षेसह इंटरव्यू क्रॅक करणंही महत्त्वाचं आहे. युपीएससी मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षेप्रमाणेच इंटरव्यूदेखील कठीण असतो. कारण यात कठीण प्रश्न विचारले जातात.
1- प्रश्न: कोणता प्राणी डोके कापल्यानंतरही बरेच दिवस जगू शकतो?
उत्तर: झुरळ
2- प्रश्न: महिन्यातून एकदा येणारी आणि २४ तासांत निघून जाणारी गोष्ट कोणती?
उत्तर: कोणतीही तारीख
3- प्रश्न: गाय दूध देते आणि कोंबडी अंडी देते. पण, दोन्ही देणारं कोण?
उत्तरः दुकानदार, जो अंडी आणि दूध दोन्ही ठेवतो.
4- प्रश्न: एक भिंत बांधण्यासाठी 8 माणसांना 10 तास लागतात, तर तीच भिंत बांधण्यासाठी 4 माणसांना किती वेळ लागेल?
उत्तरः 8 लोकांनी आधीच भिंत बांधली आहे, त्यामुळे ती पुन्हा बांधण्याची गरज नाही.
5- प्रश्न : असा कोणता दुकानदार आहे जो आपल्याकडून माल घेतो आणि मग आपल्यालाच त्याचे पैसेही द्यावे लागतात?
उत्तरः न्हावी, जो आपले केस कापल्यानंतर केस ठेवतो आणि नंतर त्याला पैसे देखील द्यावे लागतात.
युपीएससी परीक्षेसाठी पात्रता
यूपीएससी परीक्षेसाठी उमेदवार भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवार पदवी किंवा पदवीत्तोर असणे, आवश्यक आहे. तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणार्या विद्यार्थ्यांना देखील यूपीएससी परीक्षा अर्ज भरता येतो. यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्ष असणे अनिवार्य आहे.