Quartz clock : आपल्या प्रत्येकाच्या घरी भिंतीवर घड्याळ असतं. मात्र तुम्ही कधी घड्याळा निरखून पाहिलं आहे का? अनेक कंपनींच्या घड्याळावर Quartz असा शब्द लिहलेला असतो. आता तुम्ही म्हणाल, हे त्या घडाळ्याच्या कंपनीचं नाव असेल, पण नाही. मग जर आता हे कंपनीचं नाव नाही तर मग काय आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल! चला तर मग जाणून घेऊ याचा नेमका अर्थ काय आहे.
Quartz हे सिलिकॉन आणि ऑक्सिजन यांपासून तयार होणारं एक खनिज आहे. हे नैसर्गिक खनिज असून यामध्ये काही इलेक्ट्रिक गुणधर्म असतात. Quartz क्रिस्टलमध्ये असणारे इलेक्ट्रिक गुणधर्म म्हणजे piezoelectric effect आणि reverse piezoelectric effect.
Quartz क्रिस्टलवर दबाव दिला की यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो. या क्रियेला piezoelectric effect असं म्हटलं जातं. याशिवा जर Quartz क्रिस्टलला इलेक्ट्रिक चार्ज दिला तर त्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतं. यालाच reverse piezoelectric effect असं म्हणता येईल.
घड्याळामध्ये Quartz हे खनिज वापरण्यात येतं. घड्याळ बनवताना त्यामध्ये Quartz या खनिजाच्या reverse piezoelectric गुणधर्माचा वापर करण्यात येतो.
Quartz क्रिस्टलला इलेक्ट्रिक चार्ज दिला की त्यामध्ये होणारे व्हायब्रेशन क्रिस्टलच्या आकारावर अवलंबून असतात. एका ठराविक आकाराच्या Quartz क्रिस्टलला जर इलेक्ट्रिक चार्ज दिला तर होणारे व्हायब्रेशन हे अगदी तंतोतंत असतात.
घड्याळामध्ये वापरल्या जाणार्या Quartz क्रिस्टलचे एका सेकंदाला 32,768 इतके व्हायब्रेशन होतात. म्हणजेच, घड्याळात वापरल्या जाणार्या Quartz क्रिस्टलचे एकूण 32,768 व्हायब्रेशन म्हणजेच 1 सेकंद.
1 सेकंद म्हणजे किती काळ हे घड्याळातील उपकरणांना माहिती नसतं. म्हणूनच घड्याळात ठराविक आकाराचं Quartz क्रिस्टल वापरण्यात येतं. या Quartz क्रिस्टलला घड्याळातील बॅटरीच्या माध्यमातून एलेक्ट्रिक चार्ज देण्यात येतो. परिणामी Quartz क्रिस्टलचं व्हायब्रेशन सुरु होतं. 32,768 व्हायब्रेशन झालं की, घड्याळाचा सेकंद काटा पुढे सरकू लागतो.
प्रत्येक 32,768 व्हायब्रेशनच्या नंतर सेकंदाचा काटा पुढे सरकतो. याप्रमाणे घड्याळ 1 सेकंदाचा काळ मोजतो. हा सेकंद काटा 60 वेळा फिरला की मिनिट काटा फिरतो. मिनिट काटा 60 वेळा फिरला की तास काटा पुढच्या आकड्यावर जातो.