अमेठी : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी- वाड्रा यांनी अखिलेश यादव यांचा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे उमेदवार भाजपचे नुकसानच करतील, असे प्रियंका गांधी-वाड्रा म्हणाल्यात. भाजपचा फायदा करून देण्यापेक्षा मरण पत्करेन, असे प्रियंका गांधी म्हणाल्यात. भाजपला फायदा होईल, अशा प्रकारे काँग्रेसने आपले उमेदवार उभे केल्याचा आरोप अखिलेश यादवांनी केला होता. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या सभेत अखिलेश यांनी काँग्रेसवर तोफ डागली होती. त्याला प्रियंका यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराची धुरा सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान त्यांनी युपीमध्ये काही जागांवर भाजपाची मते खाण्यासाठी उमेदवारी दिले आहेत, असे वक्तव्य केले होते. याबाबत त्यांना विचारले की, काही जागांवर काँग्रेसचे असे उमेदवार आहेत ज्यामुळे भाजपला फायदा होणार आहे का? याला उत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आम्ही प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या उमेदवारामुळे भाजपला फायदा होणार नाही. आमच्यामुळे भाजपला फायदा होईल अशी परिस्थिती कोठेही नाही. त्यांचा फायदा करून देण्यापेक्षा मी मृत्यूला कवटाळेल.
#WATCH Priyanka Gandhi Vadra says," I've not said I am putting weak candidates. I've said very clearly Congress is fighting this election on its own strength. I'd rather die than benefit BJP. We have chosen candidates that are either fighting very strongly or cutting BJP votes." pic.twitter.com/UqfjfNKpxI
— ANI UP (@ANINewsUP) May 2, 2019
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. अनिल अंबानींच्या घराबाहेर चौकीदारांची रांग लागली असून नरेंद्र मोदींचा त्यात पहिला क्रमांक असल्याचे राहुल गांधी म्हणालेत. जयपूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. त्यामुळे पुन्हा मोदींना राहुल गांधी यांनी आपले लक्ष्य बनविले.