PM Modi : पंतप्रधान मोदी दीपोत्सवासाठी कुठे निघाले?

Ayodhya Deepotsav 2022:  दिवाळीच्या सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.

Updated: Oct 18, 2022, 10:47 AM IST

PM Modi Ayodhya Visit : कोरोना महासंकटानंतर यंदा दोन वर्षांनी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अख्खा देश प्रकाशाने उजळून निघणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबरला अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येत ते शरयूच्या तीरावरील दीपोत्सवात सहभागी होणार. त्याशिवाय श्री राम जन्मभूमीवर जात ते प्रभू रामांचं दर्शन घेणार आहेत. प्रभू रामाच्या राज्याभिषेक सोहळ्यातही ते सहभागी होतील. 

अयोध्येत जोरदार तयारील 

PM मोदी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत अयोध्येत असतील. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे.अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर रामाच्या पेढी घाटावर दीपोत्सवाचा भव्य उत्सव आयोजित केला आहे आणि यावर्षी दिवाळीत 17 लाख मातीचे दिवे प्रज्वलित केले जातील.  जो एक विक्रम असेल. यापूर्वी 2021 मध्ये 9.48 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते, तर 2020 मध्ये 5.84 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. दिवाळीच्या सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.  
(pm narendra modi visit ayodhya deepotsav 2022 nmp)

दौऱ्याचे वेळापत्रक 

- संध्याकाळी 5 वाजता श्री रामजन्मभूमी येथे राम लल्लाचे दर्शन 
- त्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राला भेट
- संध्याकाळी 5:40 वाजता श्री राम कथा पार्कमध्ये भगवान श्रीरामाचा अभिषेक सोहळा
- संध्याकाळी 6.30 वाजता शरयूच्या नवीन घाटावर मोदींच्या हस्ते आरती
- संध्याकाळी 6:40 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राम की पायडी घाटावर दीपोत्सव
- संध्याकाळी 7:30 वाजता ग्रीन आणि डिजिटल फटाकेचा शो 

जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने सैनिकांमध्ये सहभागी होणार असून 24 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पीएम मोदी दरवर्षी सैनिकांमध्ये दिवाळी साजरी करत आहेत.