मुंबई : व्यवसाय करण्याची इच्छा आहे पण सुचत नाहीये नेमकं कोणता व्यवसाय करावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात सतत येत असतो. नोकरी संभाळत भरगच्च पैसे कमवता येतील असा व्यवसाय म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming). या व्यवसायामध्ये किती रुपयांची गुंतवणूक केल्याने भरमसाठ पैसे कमवता येतील? या व्यवसायाची कशी सुरुवात करावी? यांसारख्या अनेक प्रश्नांच उत्तर मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) बद्दल...
व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) हा असा व्यवसाय आहे, जो छोट-छोट्या तुकड्यांच्या आधारे घराच्या छतावर देखील सुरु केला जाऊ शकतो. इस्रायल देशामध्ये या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. इस्रायलचे रहिवारी या पद्धतीचा वापर करुन अनेक पीकांचं उत्पादन घेतात. घराच्या छतावर व्हर्टिकल फार्मिंग करता येईल या हेतूने व्यवस्थापन केलं जातं. यामध्ये छोट्या कुंड्यांना अशा प्रकारे सेट केलं जातं की, त्यामधे उत्पादन घेतल्यानंतर ते ओझ्यामुळे खाली पडणार नाहीत. पीकाचं उत्पादन आल्यानंतर त्या कुंडीला खाली उतरवताना पीकाचं नुकसान होणार नाही. त्यासोबतच, पीकाला पाणी मिळावं एक विशिष्ट व्यवस्थेच्या आधारे पाण्याची व्यवस्था केली जाते.
जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल तर त्याला दर 5 वर्षांसाठी प्रति एकर जमिनीसाठी सुमारे 30.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. उदाहरणार्थ, टोमॅटोचं पीक तयार करण्यासाठी प्रति एकर कामाशी संबंधित खर्च सुमारे 9 लाख रुपये लागू शकतात. पण, यामुळे तुम्हाला सुमारे 33.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं. तुम्हाला हवं असल्यास ते 75 टक्के रक्कम कृषी कर्जाच्या स्वरूपात कर्ज म्हणून घेऊ शकतात. शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून 20 टक्के अनुदानही मिळणार आहे.
व्हर्टिकल फार्मिंग हे केवळ पिकांसाठीच नाही तर आपल्या पर्यावरणासाठीही चांगलं असल्याचं सिद्ध झालं आहे. घरांच्या भिंतींवर पिक वाढवल्याने, उन्हाळ्यात घर गरम होत नाही आणि त्याच वेळी हवेत ओलावा टिकवून ठेवतो. अनेकांच्या मते, या तंत्राने शेती केल्याने ध्वनी प्रदूषणही कमी होते आणि या तंत्राद्वारे पीक देखील सामान्य शेतीपेक्षा तिप्पट उत्पादन घेत आहे, ज्यामुळे अनेकजण लाखोंची कमाई करत आहेत.
जागेच्या कमतरतेमुळे मोठ-मोठ्या शहरांमध्ये शेतीचं उत्पादन घेणं कठीन झालं आहे. फुलं आणि सुंदर रोपट्यांबरोबर आता लोक घराच्या छतावर पीकांच उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय खतांचा वापर करुन उत्तम दर्जाचं उत्पादन घेण्याकडे अनेकांचा कल आहे. असं असलं तरी भारतातील व्हर्टिकल फार्मिंग ही इस्राईलच्या व्हर्टिकल फार्मिंगपेक्षा वेगळी आहे.