नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी भेटीस गेले आहेत. प्रकृत्यावस्थेमुळे आपल्याला पक्षाने जबाबदारी देऊ नये असे पत्र जेटली यांनी पंतप्रधानांना लिहिले होते. यानंतर जेटली यांची मनधरणी करण्यासाठी ही पंतप्रधान मोदींची भेट असणार आहे. जेटलींसारखे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळात असावेत, त्यांच्या अनुभवाचा सर्वांना फायदा होईल अशी यामागची पंतप्रधानांची भूमिका आहे. आता पंतप्रधानांच्या भेटीनंतर जेटली मंत्रिमंडळात येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
I have today written a letter to the Hon’ble Prime Minister, a copy of which I am releasing: pic.twitter.com/8GyVNDcpU7
— Arun Jaitley (@arunjaitley) May 29, 2019
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. गेल्या दीड वर्षापासून आपली प्रकृती ठिक नसून आपल्याला जबाबदारी देण्यात येऊ नये असं त्यांनी या पत्रातून म्हटले. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली होती. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर एनडीए सरकारमध्ये कोण-कोण मंत्री बनणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जवळपास ६५ ते ७० खासदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या प्रमुख खात्यांना नवे मंत्री मिळणार आहेत. ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
मागच्या वर्षी मे महिन्यात अरुण जेटली यांची किडनी प्रत्यारोपण झाले होते. यानंतर जेटलींच्या पायाला सॉफ्ट टिशू कँसर झाला. ज्याच्या सर्जरीसाठी ते जानेवारीमध्ये अमेरिकेले गेले होते. सध्या डॉक्टरांनी त्यांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री असताना त्यांनी ही जबाबदारी खूपच सक्षमपणे पार पाडली आहे.