काय आहेत तुमच्या शहरातील Petrol-Diesel चे आजचे दर? एका SMS वर मिळवा सर्व माहिती

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.  देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. 

Updated: Aug 23, 2022, 09:02 AM IST
काय आहेत तुमच्या शहरातील Petrol-Diesel चे आजचे दर? एका SMS वर मिळवा सर्व माहिती  title=

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. आज 23 ऑगस्ट 2022 रोजीही भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.  देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर 96.57 रुपये आणि डिझेलचा दर 89.76 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहर- पेट्रोलच्या किमती  -डिझेलच्या किमती

मुंबई 106.25 94.22

पुणे  105 92

नागपूर  106.03 92.58

नाशिक 106.74 93.23

हिंगोली 107.29 93.80

परभणी 108.92 95.30

धुळे  106.05 92.58 

नांदेड  108.24 94.71

रायगड  105.96 92.47

अकोला  106.05 92.55

वर्धा  106.56 93.10

नंदुरबार  106.99 93.45

वाशिम 106. 37 93.37

चंद्रपूर 106.14 92.70

सांगली  105.96 92.54

जालना 107.76  94.22

 

याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

 

जयपूर

पेट्रोल 108.48 रुपये प्रति लिटर

डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

 

अजमेर

पेट्रोल 108.43 रुपये प्रति लिटर

डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर

 

भोपाळ

पेट्रोल 108.65 रुपये प्रति लिटर

डिझेल - 93.90 रुपये प्रति लिटर

 

तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर 

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 3 महिन्यापासून कोणतेही बदल झाले नाहीत. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी आणि डिझेलवरील 8 रुपयांनी कमी केले होते. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थे आहेत. 

 

एसएमएसद्वारे दर समजतील

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.