Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ असे असतात का पाहताना तुम्हाला हसू आल्याशिवाय राहत नाही. माणसांसोबतच आता प्राण्यांचेही आता असेच काहीसे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच एक बकरीचा आणि मोराच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक बकरी आणि मोर दिसत आहे. बकरी ही मोराच्या अंगावर जात शिंगाने मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हार मानेल तो मोर कसला. मोठ्या धाडसाने मोर बकरीच्या समोर उभा राहतो आणि बकरी अंगावर यायला लागली की हवेत उडून पलीकडे जाऊन बसत असल्याचं दिसत आहे.
शक्ती पेक्षी युक्ती भारी ही म्हण आपण ऐकली असावी या म्हणीप्रमाणे मोर स्वत:ला वाचवत आहे. दोघांची तुलना केली तर बकरी ही ताकदवर आहे. बकरी अंगावर आल्यावर माणूसही लांब पळेल नाहीतर तिला हुसकावून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करेल. मात्र मोराने मोठ्या चतुराईने तापलेल्या बकरीची मजा घेत आहे.
अपनी सामर्थ्य पर हमेशा भरोसा करें,
ईश्वर ने सभी को मुसीबतों से टकराने योग्य बनाया है.#सुप्रभात pic.twitter.com/AgD9lxC4OQ— Dipanshu Kabra (@ipskabra) February 28, 2022
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. नेहमी आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, देवाने प्रत्येकाला संकटांचा सामना करण्यास सक्षम बनवलं आहे. असं कॅप्शन दीपांशु यांनी दिलं आहे. मोराच्या आणि बकरीच्या व्हिडीओतून आपण सर्वजण मोठा बोध घेऊ शकतो. संकटी कितीही मोठं असलं तरी तुम्ही हताश न होता त्याचा सामना करत रहा.