माझ्याशी लग्न कर... मुलीने नकार देताच मुलाने जे केलं त्याने गाव हादरलं!

मुलीला प्रपोज नाकारणं पडलं महागात, देवदास झालेल्या मुलाने केलेल्या कृत्याने बसेल धक्का!

Updated: Sep 27, 2022, 05:18 PM IST
माझ्याशी लग्न कर... मुलीने नकार देताच मुलाने जे केलं त्याने गाव हादरलं! title=

Crime News :  एकतर्फी प्रेम प्रकरणांमध्ये अनेकवेळा मुलींना जीवे मारण्याची धमकी, विनयभंग झालेल्या घटना आपण पाहिल्या आहेत. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. (One Side Love) एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरूणाने एका मुलीला अनेकवेळा प्रपोज केलं मात्र तिने वारंवार नकार कळवला, त्यानंतर त्याने केलेल्या कृत्याने संपूर्ण गाव हादरलं. (mathura man stabbed himself and girl after she rejected his proposal for marriage)

नेमकं काय घडलं? 
उत्तर प्रदेशमधील मथुरा (Uttar Pradesh Mathura Crime News) येथील नगला गावच्या तरूणाचं गावातीलच शेजारच्या मुलीवर त्याचं प्रेम होतं. कित्येक दिवस तो मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. शेवटी त्याने मुलीला आपल्या मनातील भावना सांगितल्या. मात्र मुलीने नकार कळवला.  मुलीने नकार दिल्यामुळे तो दुखावला गेला होता मात्र त्याने आपले प्रयत्न चालू ठेवले. कदाचित तिचा निर्णय बदलेल अशी आशा त्याला होती.

तरूणाने अनेकदा मुलीला प्रपोज केलं मात्र मुलीचा निर्णय काही बदलला नाही. सोमवारी मुलीला पाहिलं आणि तिला जाऊन प्रपोज केलं. मात्र यावेळी त्याने फक्त प्रपोज नाही केलं तर स्वत:लाच जखमी केलं. त्यानंतर मुलीवरही जीवघेणा हल्ला आणि त्यामध्ये तो जखमीही झाला. मुलीने जखमी होताच आरडाओरडा केला त्यावेळी लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती देत दोघांनाही रूग्णालयात दाखल केलं. 

तरुणीच्या आईनं सांगितलं की, त्यांचा मुलगा सकाळी सीएनजी गॅस भरण्यासाठी जात होता. यावेळी शेजाऱ्यांनी त्याला घेरलं आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. मात्र तरूणीने सांगितलं की, तरूणाने मला प्रपोज केलं, मी नकार दिल्यावर मला मारण्याची धमकी दिली. मी तिथून निघून जावू लागल्यावर त्याने स्वत:वर हल्ला करून घेतला आणि माझ्यावरही हल्ला केला.