Health insurance Plan: हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च हा किती होईल याचा अंदाज बांधता येत नाही. यामुळे अनेकजण हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी (Health insurance Policy) खरेदी करतात. हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च हा पुर्णपणे माफ व्हावा किंवा जास्तीत जास्त माफ व्हावा या हेतूने हेल्थ इंश्योरेंस पॉलिसीची खरोदी केली जाते. काही पॉलिसी अशा आहेत, ज्या पुर्णपणे क्लेम देत नाहीत. तुमचा क्लेम मर्यादेमध्ये बसत असला तरी तो देखील पुर्णपणे दिला जात नाही. तुमच्या हेल्थ इंश्योरेंस पॉलिसीमध्ये अडचण ठरु शकते ती म्हणजे 'को-पी'.
हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी (Health insurance Policy) खरेदी करताना एजेंट कडून 'को-पेमेंट' ची पॉलिसी खरेदी करण्यासाठी मागणी केली जाऊ शकते. अनेकदा पॉलिसी कंपन्यांकडून 'को-पे' लागू करते, जेव्हा तुम्ही कंपनीच्या नेटवर्कच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करत नाहीत. याबद्दल तुम्ही विमा कंपनीशी संपर्क करायला पाहिजे. काही वेळा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये कंपनीकडून 'को-पे' अटींपासून सूट देऊ शकते.
टियर-2 सिटीमध्ये राहण्याऱ्यांनी हेल्थ इंश्योरेंस (Health insurance Policy) खरेदी करताना जास्त सतर्क राहण्याची आवश्यता आहे. त्याचं कारण म्हणजे, टियर-1 शहरांमध्ये उपचार करताना पॉलिसी कंपनीकडून को-पे लागू केलं जातं. काही वेळा, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यावर कंपनी तुम्हाला 'को-पेमेंट'ची मागणी करते. यामध्ये रुपचं भाडं आणि आयसीयूचा चार्ज आकारला जातो. अनेकदा इंश्योरेंस कंपनीकडून पुर्ण क्लेम मिळत नाही आणि यामुळे उर्वरित रक्कम ही तुम्हालाचं भरावी लागू शकते.
पॉलिसी खरेदी करताना सुरुवातीला एक गोष्ट लक्षात असूद्या की, जर तुम्हाला सुरुवातीपासून कोणता आजार असेल तर विमा कंपनी 'को-पे' लागू करु शकते. पण, पॉलिसी (Health insurance Policy) खरेदी केल्यानंतर काही ठराविक काळ वाट पाहिल्यानंतर कंपनी या अटीला मागे घेऊ शकते. कमी वयाचे लोक प्रीमियमवरचं ओझं कमी करण्यासाठी 'को-पे' पर्यायाची निवड केली जाते. अशा वेळी, जे लोक आजारांनी पीडित आहेत आणि त्यांच वय 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी 'को-पे'चा पर्याय निवडू नये.