'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्हाला...', जेव्हा अझीझ प्रेमजी यांनी नारायण मूर्तीना स्पष्ट सांगितलं

Azim Premji Birthday: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys founder NR Narayana Murthy) यांनी विप्रोचे अझीझ प्रेमजी (Wipro Azim Premji) यांनी मला तुमची नियुक्ती न करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं सांगितल्याचा खुलासा केला होता.   

शिवराज यादव | Updated: Jul 23, 2024, 07:20 PM IST
'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्हाला...', जेव्हा अझीझ प्रेमजी यांनी नारायण मूर्तीना स्पष्ट सांगितलं title=

Azim Premji Birthday: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने भरीव कामगिरी करण्यात अनेकांनी मोलाचा वाटा उचलला आहे. अनेक उद्योजकांनी भारताच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं. ज्यांनी ज्यांनी देशाला उत्कृष्ट बनविण्यात आणि यश मिळविण्यासाठी नवकल्पना आणि कठोर परिश्रमाची जोड दिली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys founder NR Narayana Murthy) यामध्ये आघाडीवर होते. 1981 मध्ये कंपनीची स्थापना करणाऱ्या सात व्यक्तींपैकी ते एक होते. त्यांनी इतर अनेकांना भारतातील माहिती तंत्रज्ञान विकासाच्या मार्गावर जाण्याचा मार्ग मोकळा केला.

नारायण मूर्ती यांनी इंफोसिसच्या विकासात महत्वाची भूमिका निभावली. दरम्यान एक वेळ अशी होती जेव्हा नारायण मूर्ती यांना विप्रोने नियुक्त करण्यास नकार दिला होता. विप्रोचे अझीझ प्रेमजी (Wipro Azim Premji) यांनी याबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. नारायण मूर्ती यांनीच ही माहिती दिली होती. नारायण मूर्ती यांना त्यांनी तुमची नियुक्ती न करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं होतं. 

"अझीझ प्रेमजी यांनी मला एकदा सांगितलं होतं की, तुमची नियुक्ती न करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती," असं नारायण मूर्ती यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. तसंच नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी जर गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या तर प्रेमजी आणि विप्रोसमोर स्पर्धा उभी राहिली नसती असंही म्हटलं होतं. 

विशेष म्हणजे, नारायण मूर्तींच्या आयुष्यातील विप्रोचे कनेक्शन प्रेमजींनी नियुक्ती न कऱण्यापुरतंच नाही. मूर्ती दांपत्याचे म्यूच्यूअल फ्रेंड असणारे प्रसन्ना जे विप्रोमध्ये सीएमओ झाले होते त्यांनी त्यांच्या नात्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रसन्ना हे मूर्ती यांचे टेल्कोमध्ये सहकारी होते, जी आता टाटा मोटर्स म्हणून ओळखली जाते.

ऑक्टोबर महिन्यात नारायण मूर्ती यांनी पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, जर भारताची एकूण काम उत्पादकता सुधारायची असेल तर देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करणे आवश्यक आहे. त्यांच्या या विधानावर फार टीका झाली होती. पण नंतर त्यांनी आपल्या विधानाला अनेक मित्रांनी समर्थन केल्याचं म्हटलं होतं. पाश्चिमात्य देशातील अनेक मित्रांनी फोन करुन, आपल्याला फार आनंद झाल्याचं म्हटलं असल्याची माहिती त्यांनी दिली होती.