PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स सुरत डायमंड बोर्सचे (Surat Diamond Bourse) उद्धाघटन केले आहे. सुरत येथे नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सुरत शहराजवळील खजोद गावात बांधलेल्या सूरत डायमंड बोर्स (SDB) इमारतीचे उद्घाटन केले. रतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर माझ्या देशाची प्रगती होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधानांनवर निशाणा साधला होता.
महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच पंतप्रधानांचे अधिक लक्ष आहे अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत येथे बांधलेल्या हिरेबाजार केंद्राचे उद्घाटन केले. त्यावर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. निआज जे सत्तेत आहेत त्यांच्यात देशाचा विचार करण्याची ताकद नाही, असेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील रायगड येथे झालेल्या सभेत पवारांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली.
"आज जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे देशाचा विचार करण्याची ताकद नाही. पंतप्रधान सुरतमध्ये हिरे व्यवसायाचे उद्घाटन करणार आहेत. पूर्वी मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हिऱ्यांचा व्यापार व्हायचा. आता तो इथून गुजरातला स्थलांतरित झाला आहे. या हिरेबाजारामुळे तिथल्या लाखो लोकांना रोजगार मिळाला. मात्र सुरतला जाणार्या हिर्यांच्या व्यापारामुळे स्थानिकांना रोजगार गमवावा लागेल," असं शरद पवार म्हणाले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हिऱ्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. बीकेसीमध्ये हिरे व्यापारासाठी एक रुपयात जमीन दिल्याने तेथील लोकांना रोजगारही उपलब्ध झाल्याचे पवार म्हणाले. आज देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्राची चिंता नाही. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात आणि सुरतपर्यंत कसे नेले जावेत याकडे ते अधिक लक्ष देतात. ज्यांना देशाची फिकीर नाही त्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता असल्याचेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, गुजरातमधील सूरतमध्ये जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स बनवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉन कार्यालयापेक्षाही मोठ्या 'सुरत डायमंड बोर्स'चे उद्धघाटन केले आहे. सुरत डायमंड बोर्स हे व्यापारी संकुल 3400 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाले आहे. ही इमारत 35.54 एकर जागेवर बांधली आहे. हे ठिकाण डायमंड बाजारातील रफ आणि पॉलिश डायमंड ट्रेंडिंगचे जागतिक केंद्र बनले आहे. या इमारतीत कार्यालय सुरू झाल्यानंतर दीड लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जगभरातून सुरतमध्ये येणाऱ्या हिऱ्यांच्या खरेदीदारांना जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इंटरकनेक्ट इमारत असेल. 67 लाख चौरस फुटातील 4500 हून अधिक कार्यालये एकमेकांशी जोडली जातील. याशिवाय प्रत्येक इमारतीमध्ये या 15 मजले आहेत.