Trending News : सोशल मीडियावर एका मुलाचं खूप कौतुक होतं आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय संस्कार असावे तर असे. या मुलाची हृदयस्पर्शी कथा ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. त्याच्या कामाचं कौतुक होतं, त्याचा पालकांचाही नेटकरी कौतुक करत आहेत. त्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अंकित असं या मुलाचं नाव असून त्याने जे केलं आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सोशल मीडियावर त्याच्या गुणाबद्दल त्याचा वडिलांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मुलाने स्पर्धेत जिंकलेल्या पैशातून काय केलं हे सांगितलं आहे. (Positive News It should be a ritual After winning the competition the boy bought a special gift for family cook from the 7 thousand received)
अंकित नावाच्या या मुलाच्या वडिलांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिलंय. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, मुलाचा आणि घरात स्वयंपाक करणाऱ्या मावशीचा फोटो शेअर करत त्यांनी मुलांचं कौतुक केलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा वडिलांनी 13 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली होती. वडिलांनी लिहिलंय की, अंकितने वीकेंड टूर्नामेंट खेळताना 7,000 रुपयाचं बक्षिस पटकावलं. त्या पैशातून त्याने आमच्या घरातील स्वयंपाकी सरोजा हिच्यासाठी 2000 रुपये किमतीचा मोबाईल फोन विकत घेतला.
त्यांनी पुढे सांगितलं आहे की, आमचा मुलगा सहा महिन्यांचा असल्यापासून सरोजा त्याची काळजी घेत आहेत. आजकाल आई वडील दोघेही कामावर जातात, अशावेळी मुलांना सांभाळण्यासाठी आया ठेवल्या जातात. ज्या त्या मुलांची आपल्या लेकासारखी काळजी घेतात. त्यामुळे त्या मुलांमध्ये आणि त्या मावशीमध्ये एक ऋणानुबंध निर्माण होतं. अंकित आणि सरोजा यांचंही असंचं प्रेमाचं नातं आहे.
या पोस्टवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी मुलाने उचललेल्या अर्थपूर्ण पाऊलाबद्दल पालकांचे अभिनंदन केलंय. ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे.
Ankit has so far earned by playing weekend tournaments. And today he got our Cook Saroja a mobile phone for from his winnings. She has been taking care of him from when he was 6 Months. As parents @meerabalaji3107 and I can’t be more happier. pic.twitter.com/8tVeWdxyRh
— V. Balaji (@cricketbalaji1) December 13, 2023
व्हायरल झालेल्या पोस्टवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'उत्कृष्ट काम.'
Being a good human being is the first step towards being a successful one. Kudos to Ankit for such a thoughtful gesture and making the world brighter with the joy of giving.
Proud parents @cricketbalaji1 & @meerabalaji3107. https://t.co/fjI6Ou2BmC— DK (@DineshKarthik) December 13, 2023
आणखी एका यूजरने लिहिलंय की, 'मुलं अशा गोष्टी त्यांच्या पालकांकडूनच शिकतात', तर दुसऱ्या यूजरने म्हटलंय की, 'आम्हाला अंकितचा अभिमान आहे.'