Chandrayaan-3 landing Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-3 ( Chandrayaan-3 ) आता अंतिम टप्प्यात आहे. जुलै महिन्यात चांद्रयान अवकाशात पाठवलं होतं. त्यानंतर आता चांद्रयानावरच सर्वांच्या नजरा खिळल्याचं पहायला मिळतंय. अवघ्या काही तासात आता चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर लँड (Chandrayaan-3 landing) करेल. मात्र, हे लँडिंग सोपं असणार नाही. इस्त्रो (ISRO) सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याने मोहिमेला यश मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता चांद्रयान-3 साठी देशभरातून प्रार्थना होत असल्याचं पहायला मिळतंय.
चांद्रयान मोहीम निर्धारित वेळेतच परडणार असल्याची खातजमा इस्त्रो करत आहे. त्याचा 42 सेकंदाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. इस्त्रोची मोहित सफल व्हावी, यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. कोणी मंदिरात देवाला नारळ फोडून प्रार्थना करत आहे, तर कोणी नमाज पठण करताना दिसत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे.
#WATCH | Uttar Pradesh | People offer namaz at the Islamic Center of India in Lucknow for the successful landing of Chandrayaan-3, on August 23. pic.twitter.com/xpm98iQM9O
— ANI (@ANI) August 22, 2023
लखनऊ ईदगाहचे इमाम खालीद रशीद फिरंगी महाली यांनी याबाबतची माहिती दिली. इस्लामिक सेंटर मदरशात मुलांनी नमाज पठण केलं, तसेच चांद्रयानाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी प्रार्थना देखील केली आहे, असं इमाम खालीद रशीद फिरंगी महाली यांनी सांगितलं. इथं विज्ञानाचाही अभ्यास करतात त्यामुळे त्यांना याबद्दल खूप उत्सुकता आहे. मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. ISRO च्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन. जर उद्या अनपेक्षित चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग यशस्वी झालं, तर भारत हा यशस्वीपणे उतरणारा पहिला देश असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
#WATCH चंद्रयान-3 मिशन की सफलता के लिए आज देहरादून के टपकेश्वर महादेव मंदिर के माता वैष्णो देवी गुफा में पूजा शुरू हो गई है। यह 23 अगस्त को चंद्रयान की सफल लैंडिंग तक जारी रहेगा। pic.twitter.com/MeKsgxtI6z
— ANI_HindiNews (@AHindinews) August 22, 2023
#WATCH | Lucknow Eidgah Imam scholar Khalid Rasheed Firangi Mahali says, "Children offered namaz at Islamic Center madrasa and prayed for the successful landing of Chandrayaan-3...They also study science here so they have a lot of curiosity regarding this. I extend my heartiest… https://t.co/Bo9pG1psFL pic.twitter.com/xRZj0UcjKc
— ANI (@ANI) August 22, 2023
दरम्यान, प्रत्यक्ष लँडिंगच्या दिवशी खासकरुन शेवटच्या 15 मिनिटात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण हाच मिशनमधील सर्वात अवघड टप्पा असणार आहे. 'टचडाऊन' ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रत्येकाने सतर्क राहणं आवश्यक आहे, कारण त्याच्या यशासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक असतं.