लग्नाच्या 17 व्या दिवशीच पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून उडेल थरकाप

MP Crime : पतीने आपल्या नवविवाहित पत्नीची हत्या केली असून स्वत:वरही चाकूने वार केले आहेत. आरोपीवर उपचार सुरू असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 8, 2023, 11:47 AM IST
लग्नाच्या 17 व्या दिवशीच पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून उडेल थरकाप title=

Crime News : मध्य प्रदेशातून (MP News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपी पती-पत्नीच्या पवित्र नात्यातील सर्व गोष्टी तो विसरला आणि अचानक त्याच्यातला सैतान जिवंत झाला. आरोपीने इतके भयानक कृत्य केले की ते ऐकून आणि पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरला आणि अस्वस्थ झाला आहे. लग्नाच्या अवघ्या 17 दिवसानंतरच बुधवारी एका व्यक्तीने पत्नीचा गळा चिरला आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. लग्नानंतर अवघ्या 17 दिवसातच नवरा राक्षस झाला. पोलिसांनी (MP Police) आरोपीला अटक केली असून तपास सुरु आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील धार नाका येथील रहिवासी असलेल्या विक्रम उर्फ ​​विक्कीचा अंजलीसोबत २१ मे २०२३ रोजी विवाह झाला होता. दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते. त्यानंतर 7 जून रोजी विकीने चाकूने अंजलीची निर्घृण हत्या केली. आरोपीच्या हातालाही दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक हितिका वासल यांनी सांगितले की, देपालपूर येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय अंजली सटोलियाचा बुधवारी सकाळी तिच्याच घरी खून करण्यात आला असून तिच्या गळ्यावर 15 हून अधिक वार करण्यात आले होते.

आरोपी विक्रम आणि मृत अंजलीचे लग्न याच वर्षी 21 मे रोजी झाले होते. दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते. त्यानंतर 7 जून रोजी विकीने अंजलीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. आरोपीने अंजलीच्या अंगावर 10 वार केले होते. अंजलीच्या गळ्यापासून शरीराच्या अनेक भागांवर चाकूने वार करण्यात आले. अंजलीच्या किंकाळ्या ऐकून विकीच्या कुटुंबीयांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली होती. सासरच्यांनी पाहिले तेव्हा अंजली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. 

"मृत महिलेच्या सासरच्यांनी सांगितले की, काही कारणातून दोघांमध्ये वाद झाला. वाद एवढा वाढला की अंजलीचा पती विक्रम याने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि हातावर वार करण्यापूर्वी तिच्यावर वार केला. दोघांनाही कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले, तेथे अंजलीला मृत घोषित करण्यात आले आणि विक्रमला उपचारासाठी दाखल करण्यात आले," ग्रामीण पोलीस अधीक्षक हितिका वासल यांनी सांगितले.

कशामुळे झाली हत्या?

"गुन्ह्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, प्रथमदर्शनी असे दिसते की, पिथमपूर येथील कारखान्यात काम करणाऱ्या आरोपी विक्रांतला मृत महिलेशी लग्न करायचे नव्हते. त्याला लग्न करण्यास भाग पाडले गेले. यामुळेच या जोडप्यामध्ये वारंवार भांडणे होत होती," असे पोलीस अधीक्षक हितिका वासल म्हणाल्या. दुसरीकडे हुंड्यावरुन झालेल्या भांडणातून ही हत्या झाल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान,  आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तर या घटनेनंतर मृत महिलेच्या सासरचे लोक फरार झाले आहेत.