Gold Silver Rate on 8 June 2023 : सोन्या-चांदी खरेदीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही सोने दागिने खरेदी करायचा विचार कर असाल तर सध्या हा सोने चांदीचा चांगला मुहूर्त आहे. सध्या सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भावाच्य आघाडीवार ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरात कोणतीही वाढ न झाल्याने सराफा बाजारात ग्राहकांची संख्या वाढली आहे. सोन्याचे दर 60 हजार रुपयांच्या घरात आल्याने खरेदीदारांना ही मोठा दिलासा मिळाल आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, बुधवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव 60,028 रुपये होता. मात्र आज (8 जून 2023 ) सकाळी 59957 रुपये आहे. तर या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सोने 68 रुपयांनी स्वस्त होऊन प्रति 10 ग्रॅम 60,028 रुपयांवर पोहोचले. तर मंगळवारी सोन्याने 495 रुपयांची उसळी घेतली आहे. सोन्याचा भाव 60096 रुपये होता.
तर दुसरीकडे बुधवारी चांदीच्या दरात घसरण दिसून आली. चांदी 80 रुपयांनी स्वस्त होऊन 71,824 रुपये प्रति किलोवर बंद झाली. मंगळवारी चांदी 442 रुपयांनी महागून 71904 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
बुधवारी 24 कॅरेट सोने 60028 रुपयांनी, 23 कॅरेट 59788 रुपयांनी, 22 कॅरेट 54986 रुपयांनी, 18 कॅरेट 45021 रुपयांनी आणि 14 कॅरेटचे दर 35116 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीवर कोणतेही शुल्क नाही. सराफा बाजारात ड्युटी आणि टॅक्सचा समावेश केल्यामुळे किमतीत तफावत दिसून येत आहे.
जर तुम्ही 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर लवकरच एसएमएस येईल. त्या आधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच, किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com किंवा इतर ठिकाणांहून माहिती घेऊ शकता.
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाउनलोड करा. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हे BIS अॅप मिळवू शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित केला जातो. हा नंबर टाईप केल्यावर, हॉलमार्किंगचा संपूर्ण तपशील दिसेल आणि शेवटी, किती कॅरेट सोने आहे.