Crime News In Marathi: बेंगळुरु येथील एका नामांकित कंपनीच्या सीईओने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ग्रेटर नोएडा येथेही अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या चार वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी इतकं मोठं पाऊल उचललं की संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. महिलेने तिच्या सहा महिन्याच्या मुलीला कुशीत घेऊन 16 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
6 महिन्याच्या मुलीला कुशीत घेत...
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील बिसरख ठाणे परिसरातील एका निवासी इमारतीत सोसायटीत बुधवारी ही घटना घडली आहे. सारिका नावाच्या एका महिलेने तिच्या 6 महिन्यांच्या मुलीसह इमारतीच्या 16 व्या मजल्यावरुन उडी घेतली आहे. आई-मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबाला जशी याबाबत माहित होताच त्यांच्यावर मोठा आघात कोसळला आहे. या घटनेने सगळेच सून्न झाले आहेत. कुटुंबीयांचे रडून रडून हाल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेल्या चार वर्षांचा एक मुलगा देखील आहे. मंगळवारी त्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेने तिच्या मुलीसह इतका मोठा निर्णय घेतला. या प्रकरणात पोलीस तिच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे. महिला डिप्रेशनमध्ये होती, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, तिच्या आत्महत्येचं कारण हेच आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणी कुटुंबीयांची चौकशी केली तेव्हा घरातील सदस्यांनी कारण सांगितले आहे. सारिकाचे लग्न 2021 साली झाले होते. तिला एक चार वर्षांचा मुलगाही आहे. त्यानंतर तिने मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर ती सतत आजारी राहू लागली. या आजारपणामुळं ती डिप्रेशनची शिकार झाली. तिच्यावर उपचारदेखील सुरू केले होते. मात्र, उपचार पूर्ण होण्याआधीच तिने हा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. त्यानंतर पुढची कारवाई केली जाणार आहे.