नवरा काहीही न सांगता Sex Change Operation करुन अचानक घरी आला अन्...; धक्कादायक घटना

Indian Wife Husband Sex Change Operation Case: जवळपास एक महिना या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांपासूनच चौकशीला सुरुवात केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 11, 2024, 11:38 AM IST
नवरा काहीही न सांगता Sex Change Operation करुन अचानक घरी आला अन्...; धक्कादायक घटना title=
पोलिसांनी एका महिन्यात केली गुन्ह्याची उकल (प्रातिनीधिक फोटो)

Wife Murdered Husband Case: तेलंगणमधील हैदराबादेतील सिद्दीपेठ येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीला कोणताही पूर्व कल्पना न देता नवरा परस्पर लिंगबदल शस्त्रक्रीया (सेक्स चेंज ऑपरेशन) करुन आला. पतीने आपण ट्रान्सवुमन असल्याचा खुलासा या पतीने पत्नीसमोर केल्यानंतर तिला धक्काच बसला. पतीने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवल्याच्या रागात पत्नीने पतीची हत्या घडवून आणली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीसहीत 3 जणांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. एका महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लागला.

तो साडी नेसून तिच्या ऑफिसला जायचा अन्...

मृत व्यक्ती आणि या महिलेचं 2014 मध्ये लग्न झालं. पुढल्याच वर्षी म्हणजे 2015 मध्ये या दोघांना एक मुलगी झाली. मात्र पत्नीने माहेरुन अतिरिक्त हुंडा आणावा या मागणीसाठी पती तिचा छळ करायचा. अचानक पत्नीला कोणतीही कल्पना न देता या व्यक्तीने लिंगबदल शस्त्रक्रीया (सेक्स चेंज ऑपरेशन) करुन घेतली आणि तो साडी नेसू लागला, अशी माहिती तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पत्नीपासून लपून लिंगबदल शस्त्रक्रीया (सेक्स चेंज ऑपरेशन) केल्यानंतरही तो तिला छळत राहिला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, तो पत्नीच्या ऑफिसच्या ठिकाणी साडी आणि विचित्र कपडे परिधान करुन जायचा आणि गोंधळ घालायचा. सतत नामुष्की सहन करावी लागत असल्याने या महिलेला वारंवार तिची नोकरी बदलावी लागत होती. 

सन्मान कमी झाला

"नवऱ्यामुळेच आपल्याला अनेकदा नोकरी सोडावी लागत आहे असं आरोपी महिलेला वाटत होतं. तसेच आपला आणि आपल्या मुलीचा सन्मान पतीने लिंगबदल शस्त्रक्रीया (सेक्स चेंज ऑपरेशन) करुन घेतल्याने कमी झाला आहे," असं सिद्दीपेठमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

18 लाखांची सुपारी दिली

आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी या महिलेने एका व्यक्तीला 18 लाखांची सुपारी दिली. या महिलेने अगाऊ रक्कम म्हणून सुपारी घेतलेल्या व्यक्तीला 4.6 लाख रुपयेही दिले. 11 डिसेंबर रोजी महिलेने तिच्या पतीला दारु पाजली. त्यानंतर पती झोपीत केल्यानंतर त्याची हत्या केली. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवण्याचा प्रयत्न महिलेने केला. 

महिनाभर तपास

पोलिसांना ट्रान्सवुमनची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हा नोंदवून घेतली. पोस्टमार्टममध्ये हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीला केंद्रस्थानी ठेऊन तपास सुरु केला. परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर गोष्टींच्या आधारे पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर महिनाभराने या महिलेने आपला गुन्हा कबुल केला.