Maharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे

Updated: Mar 2, 2023, 12:59 PM IST
Maharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार title=

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो शिवसेना संसदीय पक्षाच्या कार्यालयातून चोरीला गेल्याची तक्रार ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लोकसभा अध्यक्षांना (Loksabha Speaker) पत्र लिहून ही तक्रार केली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो चोरीला गेल्याचं विनायक राऊत यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. तसंच फोटो चोरीला गेल्याचा तपास व्हावा आणि कार्यालयात पुन्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात यावेत अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे (Shivsena Symbol) गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे गट (Shinde Group) चांगलाच आक्रमक झाला आहे. नाव आणि चिन्हानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला (Thackeray Group) आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे गटाने संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो काढले. त्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आनंद दिघे (Anand Dhighe) यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

राज्यातील विधीमंडाळातील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाकडे आल्यानंतर आता संसदीतल शिवसेनेचं कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. ठाकरे गटाकडून संसदेतल्या ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्याही रद्दबादल करण्यात आल्या आहेत. संसदेत आता शिवसेना शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांचा व्हिप चालणार आहे. तसंच याआधी मुख्यनेतेपदी संजय राऊत होते, पण आता हे पद गजानन किर्तीकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. 

सत्तासंघर्षाची सुनावणी
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज अखेरची सुनावणी होणार आहे. आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस असणार आहे. सध्या शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. आज हा युक्तिवाद पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर  सुप्रीम कोर्ट दुपारी चार वाजता निकालाचा दिवसही ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडे सा-या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान आज सुनावणी पूर्ण होत असून लोकशाहीवरच प्रश्न निर्माण झाल्याची प्रतिक्रीया ठाकरे गटाच्या अनिल देसाईंनी दिलीये.