मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 24, 2023, 01:50 PM IST
मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू  title=

Madurai Boy Died: हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यामुळे अगदी लहान वयातही मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मदुराई येथे 20 वर्षाच्या तरुणाचा हृद्य विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर त्याला हृदयविकाराच्या झटका आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

मुदराईमध्ये 20 वर्षाचा तरुणा मॅरेथॉनमध्ये धावला. त्यानंतर काही तासांनी त्याला अपस्माराचा त्रास झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दिनेश कुमार असे मृताचे नाव आहे. 

दिनेश कुमार याने उथीराम 2023 रक्तदान मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. या मॅरेथॉनला आरोग्यमंत्री सुब्रमण्यम आणि व्यावसायिक कर आणि नोंदणी मंत्री पी मूर्ती यांनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर भव्य मॅरेथॉन सुरु झाली. इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला. 

दिनेशला मिरगीचा त्रास होत आहे असे वाटून मित्रांनी त्याला तात्काळ त्यांनी तात्काळ जवळच्या राजाजी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सकाळी 8:45 च्या सुमारास दिनेश याला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. रुग्णालयात आणल्यानंतर काही तासांनंतर म्हणजे सकाळी 10:10 च्या सुमारास त्याला हृदयविकाराचा झटका आला, असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिनेशला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. दरम्यान सकाळी 10:45 वाजता दिनेशला मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दिनेशच्या मृत्यूचे नेमके काय कारणं आहे? याचा अधिक तपास करण्यासाठी  मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

दिनेश कुमार हा मदुराई येथील एका खासगी महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवीचे अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

मुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे 26 मृत्यू 

मुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे 26 तर कॅन्सरमुळे 25 जणांचा मृत्यू होतोय. 2022 या वर्षात मुंबईत हार्ट अॅटॅकनं सर्वाधिक मृत्यू झाल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.  मुंबईला ह्रदयविकार आणि कॅन्सरचा विळखा पडलाय.  2022 मध्ये कोरोनाने कमी तर ह्रदयविकार आणि कॅन्सर यामुळे मुंबईकरांचे जीव गेले आहेत. 2022 मध्ये कुठल्या विकारामुळे किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती RTI म्हणजेच माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली होती. मुंबईकर चेतन कोठारी यांनी ही माहिती आरोग्य विभागाकडून मागितली होती. या अहवालातून हा धक्कादायक आकडा समोर आला. कोरोना या आजारामुळे 2020 या वर्षात 10 हजार 289 जणांचा बळी गेला. तर 2021 मध्ये 11 हजार 105 आणि 2022 मध्ये 1891 मुंबईकरांनी आपले प्राण गमावले. पण हार्ट अटॅकमुळे रोज 26 मुंबईकरांना जीव गमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली.