जेथे स्वत: 3 हजार पोर्टमॉर्टम केलं, तेथेच डॉक्टरचाही ठेवला मृतदेह... मृत्यूपूर्वीचा तो व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलं आहे. काही लोकांचं नशीब चांगलं असलं आणि त्यांना ताबडतोब उपचार मिळाला, तर लोकांचे प्राण देखील वाचताता.

Updated: Oct 20, 2021, 01:07 PM IST
जेथे स्वत: 3 हजार पोर्टमॉर्टम केलं, तेथेच डॉक्टरचाही ठेवला मृतदेह... मृत्यूपूर्वीचा तो व्हिडीओ व्हायरल title=

भोपाळ : सध्या सर्वत्र लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलं आहे. काही लोकांचं नशीब चांगलं असलं किंवा ताबडतोब उपचार मिळाला, तर लोकांचे प्राण देखील वाचताता. परंतु यामुळे अनेकांचे प्राण देखील यामुळे गेले आहे. सध्या अशीच अक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका 67 वर्षीय डॉक्टरला हार्ट अटॅक आला होता. त्याच्या आजुबाजूला जवळ-जवळ 50 डॉक्टर उपस्थीत असून देखील त्याला वाचवणे शक्य झाले नाही.

ही घटना भोपाळमधील आहे. येथे एका गेट टू गेदर दरम्यान अनेक डॉक्टर एकत्र आले होते. पार्टीमध्ये डान्स करता करता एका सिनियर डॉक्टर सीएस जैन यांना हार्ट अटॅक आला. त्यावेळेसे या पार्टीत उपस्थित डॉक्टरांना त्यांच्याकडून यांना वाचवण्याचा जमेल तो प्रयत्न केला आणि त्यांना जवळील मल्टी स्पेशियलिटी स्मार्ट सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तरी देखील त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.

ही घटना रविवारी संध्याकाळी उशीरा हॉटेल जहांनुमा येथे घडली. या पार्टीतील व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या पार्टीत शहरातील टॉप लेव्हलचे डॉक्टर उपस्थित होते. त्या दरम्यान ही घटना घडली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, सगळे डॉक्टर 'ऐसा मौका फिर कहां मिलेगा...' या गाण्यावरती डान्स करत होते. डॉक्टर सीएस जैन देखील सगळ्या डॉक्टरांसोबत तेथे डान्स करत होते. तेव्हा अचानक ते थांबले आणि खाली कोसळले.

डॉक्टर सीएस जैनचे भाऊ वीरेंद्र जैन यांनी सांगितले की, पार्टीदरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला.

त्यांनी सांगितले की, सीएस जैन यांनी ज्या ठिकाणी 3 हजार मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले होते, त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह ही नेण्यात आला होता. डॉ.जैन हे मेडिकोलेगल इन्स्टिट्यूटमध्ये बराच काळ कार्यरत होते. त्यांनी तीन हजारांहून अधिक मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले होते.

त्याचा मृतदेह मेडिकोलेगल संस्थेच्या शीतगृहात ठेवण्यात आला होता. डॉ.जैन यांचे अंतिम संस्कार मंगळवारी भडभडा विश्राम घाट येथे करण्यात आले.