सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी कितवी शिकल्यायत? करिअरबद्दल जाणून घ्या

Bansuri Sushma Swaraj: माजी परराष्ट्र मंत्री दिवगंत सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत

Pravin Dabholkar | Updated: Mar 2, 2024, 09:23 PM IST
सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी कितवी शिकल्यायत? करिअरबद्दल जाणून घ्या title=
Basuri Swaraj

Bansuri Sushma Swaraj: भाजपतच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री दिवगंत सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. बासुरी यांची आई सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यांचे वडिल स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयात सिनीअर अॅडव्होकेट आहेत. ते 6 वर्षे राज्यसभेद खासदार राहिले आहेत. याशिवाय मिझोरमचे राज्यपालही राहिले आहेत. स्वराज कौशल हे आतापर्यंतचे सर्वात कमी वर्षात राज्यपाल बनणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी आहेत. 

सुषमा स्वराज यांचा अभ्यास, त्यांची बोलण्याची पद्धत, मुद्देसुद मांडणी अशा विविध गुणांमुळे विरोधी पक्षातही त्यांचे चाहते होते. सुषमा यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. सुषमा यांची लेक बासुरी या आईच्या पावलावर पाऊल टाकतील आणि ही पोकळी भरून काढतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती.

सन 2019 मध्ये सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर बासुरी स्वराज या राजकारणात येतील असे म्हटले जात होते. पण 2023 मध्ये भाजप दिल्ली प्रदेश कायदेशीर सेलचे सहसंयोजकचे पद देण्यात आले होते. याशिवाय त्यांच्याकडे भाजपच्या प्रवक्तेपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. 

BJP Candidate List : भाजपकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर, नरेंद्र मोदी 'या' मतदारसंघातून लढणार!

बासुरी यांचे करिअर 

राजकारणाव्यतिरिक्त बासुरी स्वराज सर्वोच्च न्यायालयात कायद्याचा अभ्यास करतात. 2007 मध्ये त्यांनी दिल्ली बार काऊन्सिलमध्ये नोंदणी केली. गुन्हेगारी प्रकरणांव्यतिरिक्त, बासुरी या रिअल इस्टेट, कर आणि कराराशी संबंधित प्रकरणांमध्ये प्रॅक्टीस करत आहेत. याआधी कायदा आणि संविधान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांकडे राहून त्या काम शिकत होत्या. असे असले तरी बासुरी यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊन निवडणूक लढवावी अशी भाजपच्या विशेषत: सुषमा स्वराज यांच्या चाहत्यांची इच्छा होती. 

ऑक्सफर्डसह अनेक प्रसिद्ध विद्यापीठांमधून शिक्षण

बासुरी स्वराज यांनी वारविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीए ऑनर्स पदवी घेतली आहे. पदवीनंतर, बासुरी यांनी लंडन बीपीपी लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली. 

विरोधकांनी केली होती टिका 

बासुरी यांनी कायद्यात बॅरिस्टर म्हणूनही पदवी मिळवली आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या कायदेशीर संघाशी संबंधित असल्याबद्दल त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी बासुरी स्वराज चर्चेत आल्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या मुलीचा स्वतःचा व्यवसाय आहे, असे भाजपने तेव्हा आपल्या बचावात म्हटले होते. त्या सुषमा स्वराज यांच्या कन्या असल्या तरीही बासुरी यांना त्यांचे काम निवडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा खुलासा यावेळी करण्यात आला होता.