Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड असल्याचं सांगण्यात आलं होत. मुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेसची फॉम्युला ठरला आहे.     

Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

13 May 2023, 06:51 वाजता

कर्नाटकातील 36 ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे. 

13 May 2023, 06:50 वाजता

कर्नाटक निवडणुकीत 2,615 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

13 May 2023, 06:49 वाजता

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे.

13 May 2023, 06:44 वाजता

Karnataka Election Live : कोणाचं पारड जड?

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 

13 May 2023, 06:37 वाजता

Karnataka Election Live : भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई

या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधीं, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधींनी कर्नाटक अक्षरश: पिंजून काढला होता.