Live Murder CCTV: भररस्त्यात चाकूने वार, महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण...; Live मर्डर कॅमेऱ्यात कैद

तामिळनाडूत पतीने भररस्त्यात पत्नीची निर्घृणपणे हत्या केली असून ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलेची हत्या होत असताना कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे धावलं नाही. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी पतीला अटक केली आहे.  

Updated: Jan 24, 2023, 11:48 AM IST
Live Murder CCTV: भररस्त्यात चाकूने वार, महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण...; Live मर्डर कॅमेऱ्यात कैद title=

Crime News: तामिळनाडूमधील (Tamilnadu) वेल्लोर येथे पतीने भररस्त्यात पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेरियावरिगम परिसरात ही घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं नाव पुनीता असून ती एका बुटाच्या कारखान्यात काम करत होती. सोमवारी संध्याकाळी ती कामावरुन घरी परतत होती. त्याचवेळी तिचा पती जयशंकर याने तिला रोखलं. त्याने पुनीतासह भांडण सुरु केलं. दोघेही यावेळी रस्त्यावर उभे होते. पुनीता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण जयशंकर वारंवार तिला रोखत होता. 

यानंतर त्याने खिशातून चाकू काढला आणि सातवेळा पुनीतावर वार केले. भररस्त्यात हा सगळा प्रकार घडल्याने पादचाऱ्यांनाही धक्का बसला. पण एकानेही पुढे येऊन जयशंकरला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचवेळी मागून एक महिला आली आणि तिने जयशंकरला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. महिलेने अडवण्याचा प्रयत्न केला असता जयशंकरने तेथून पळ काढला. 

हल्ल्यात पुनीता गंभीर जखमी झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात ती खाली पडलेली होती. यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांना फोन केला. पुनीताला रुग्णालयात नेण्यात आलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं. 

पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीची ओळख पटवत त्याला अटक करण्यात आली. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.